आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमबहुल देशात जाऊन दिले याेगाचे धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घरची परिस्थिती बेताची... दाेन वेळ पाेटभर खायला मिळेलच याची शाश्वती नसायची... अंगावर घालायला नीटसे कपडेही नसत... अशाही परिस्थितीत पाेटाला चिमटा घेत ज्ञानाेबा लाड यांनी अापले शिक्षण चालू ठेवले... मानपाठ एक करून अभ्यास केला.. अाैरंगाबाद येथे हाेमिअाेपॅथीचे शिक्षण घेऊन ते डाॅक्टर झाले... पण त्यातही ते फारसे रमले नाहीत.
याेगाच्या शिक्षणाची अाेढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी अांतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या बिहार स्कूल अाॅफ याेगामध्ये प्रवेश घेतला अाणि त्यांनी याेगातील एमएस्सी इन अप्लाइड याेग (व्यावहारिक याेग) ही उच्च पदवी प्राप्त केली. केवळ याेगासाठीच समर्पित जगातील हे पहिले विद्यापीठ अाहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कतारसारख्या मुस्लिमबहुल देशात हजाराे युवकांना याेगाचे प्रशिक्षण देऊन याेगाविषयीचे त्यांचे गैरसमज दूर केले. बीड जिल्ह्याच्या पाटाेदा तालुक्यातील चिखली (नाथ) हे डाॅ. ज्ञानाेबा लाड यांचे जन्मगाव. माेठ्या बंधूंकडे अाग्रह धरत चक्रासन, शीर्षासन, वृश्चिकासन, मयूरासन ही अवघड अासने शिकून घेतली. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी याेगाचा अभ्यास सुरू केला. हाेमिअाेपॅथीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ३ वर्षे क्लिनिकही चालवले. त्याच काळात त्यांना अाैरंगाबादच्या डाॅ. चारुलता राेजेकर यांनी बिहार स्कूल अाॅफ याेगाची माहिती सांगितली. अलीकडेच ते कतारमध्ये दीड वर्ष अाणि मालदीवमध्ये तीन महिने याेगाचे प्रशिक्षण देऊन भारतात परतले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...