आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रध्‍देच्या आड कोणी आल्यास त्याला चीतपट करू - उध्‍दव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अंधश्रद्धेला आमचाही विरोध आहे; परंतु अंधश्रद्धेच्या नावाने श्रद्धेच्या आड जर कोणी येत असेल तर त्याला आम्ही चीतपट केल्याशिवाय राहणार नाहीत, असा सज्जड इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत भूमिका मांडली. हे विधेयक केवळ हिंदू धर्माला समोर ठेवून तयार न करता त्यात सर्वधर्मीयांचाही समावेश असावा, अशी मागणी त्यांनी केली. दाभोलकरांचे मारेकरी अद्याप मिळाले नसतानाही हिंदुत्ववादी संघटनांवरच बंदी घालण्याची भाषा खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिक येथील पदाधिका-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.


दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या मेळाव्यास हजारो शिवसैनिक उपस्थित होते.


छगन भुजबळांचे डिपॉझिट जप्त करा
* भुजबळ हे शिवसेनेला विकत घेऊ पाहताहेत असे बोलले जाते; पण शिवसेनेला विकत घेण्याची ताकद काँग्रेसची नाही आणि राष्‍ट्रवादीचीही. शिवसैनिक कधीही विकला जाणार नाही. भुजबळांची या मर्दाशी गाठ आहे. आपल्याला भुजबळांचाचे डिपॉझिटही जप्त करायचेच आहे; पण त्याबरोबर राज्यात आपले सरकारही येणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीनेदेखील शिवसैनिकांनी
प्रयत्न करावेत.
* हिंदू चिरडले गेले तरी चालतील; पण मुस्लिमांच्या मतांच्या जिवावर मी पंतप्रधान बनेल, असे जर शरद पवारांना वाटत असेल तर ते आम्ही ते चालू देणार नाही. आमचा विरोध पाकिस्तानप्रेमी मुस्लिमांना आहे. पवारांनी आजवर कधीही हिंदूंची बाजू घेतलेली नाही. इशरत ही निष्पाप होती, असे पवार आज म्हणताहेत. ती निष्पाप होती तर मग दहशतवाद्यांबरोबर ती फिरायला गेली होती का?
* मुंबईतील महिला पत्रकारावर बलात्कार करणा-यांची नावे जाहीर करण्याची गरज नाही. त्यांना थेट फासावरच लटकवायला हवे. कारण त्यात जर हिंदूंव्यतिरिक्त कोणी असले तर शरद पवारांना त्यांचा पुन्हा पुळका येऊ शकतो.


भुजबळ राष्‍ट्रवादी सोडणार का ?
मंडल आयोगाविषयीची भूमिका पटली नाही म्हणून भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसत शिवसेना सोडली. आता मराठा आरक्षणाबाबत पवार आणि भुजबळ यांची भूमिकाही परस्परविरोधी आहे. अशा वेळी भुजबळ राष्‍ट्रवादी सोडणार का, असा सवाल शिवसेनेचे सचिव सुभाष देसाई यांनी केला.