आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांना कांदा परवडत नाही त्यांनी तो खाऊ नये, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा अजब सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘काही लोक कधीच कांदा न खाताही तंदुरुस्त राहतात. काही लोक अगदीच कमी प्रमाणात कांदा खातात मात्र त्यांनाही कांद्याचे भाव वाढल्यानंतर वाईट वाटते, ते दर वाढल्यामुळे बाेंब ठाेकतात.  त्यामुळे  सरकारला नाईलाजास्तव कांद्याची निर्यात बंद करावी लागते किंवा कधी कधी इतर देशातून कांदा आयात करून बाजारभाव स्थिर ठेवावी लागते. अशावेळी ज्यांना दरवाढ झालेला कांदा परवडत नाही, त्यांनी ताे खाऊच नये,’ असा सल्ला राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यातील नागरिकांना दिला अाहे.


कळवण येथे पणन मंडळाचे निर्यात सुविधा केंद्र व संघाचे नूतन कार्यालय आणि व्यापारी संकुलाच्या उद‌्घाटन कार्यक्रमात ते बाेलत हाेते.  कळवणचा शेतकरी सहकारी संघ जर येणाऱ्या काळात प्रक्रिया उद्योग सुरु करून कार्यक्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार देऊ शकला तर हा संघ राज्यातील मॉडेल संघ ठरेल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...