आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरील ध्वज पोलिसांत जमा करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात शनिवारी (दि. १५) स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम होणार आहेत. ध्वजारोहणानंतर बहुतांश वेळा कागदाचे राष्ट्रध्वज रस्त्यावर पडल्याचे दिसून येते. त्यामुळे होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी रस्त्यावर ध्वज पडलेला अाढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात तो जमा करण्याचे आवाहन आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केले आहे. प्रथमच पोलिस दलाकडून असे आवाहन करण्यात आलेले आहे.