आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नावनोंदणीसाठी डॉक्टरांकडून जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मतदार यादीत नावनोंदणीसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही नागरिक नावनोंदणीबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काही डॉक्टरांनी मतदार नावनोंदणीसाठी जनजागृती सुरू केली आहे. यात वडाळारोड परिसरातील डॉ. इज्हार खान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मोहिमेत प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन मतदान नावनोंदणीबाबत जनजागृती केली जात अाहे.

सुज्ञ नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे अावाहन करण्यात अाले अाहे. मात्र, अाजही अनेक नागरिकांचे मतदान यादीत नाव नाही. काहींनी नावे नाेंदवली, पण त्यांचे छायाचित्र समाविष्ट नाही. या नागरिकांनी नावे नोंदवण्यासाठी हे डाॅक्टर्स पुढाकार घेत अाहेत. विशेष म्हणजे, हे डाॅक्टर्स त्यांना नोंदणीचा अर्जदेखील उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांचे कार्य अधिक साेपे हाेत अाहे.

माेहीम सुरू...
^मतदानयादीत नाव नाेंदवले गेले नसल्यामुळे अनेक नागरिक अाजही त्यांच्या मतदान हक्कापासून वंचित अाहेत. हे चित्र बदलण्यासाठी वडाळारोड, अशोका मार्ग, वडाळागाव जुन्या नाशकात मतदान नाव नाेंदणीबाबत जनजागृती माेहीम सुरू केली आहे. -डॉ. इज्हार खान
बातम्या आणखी आहेत...