आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर्स आणि पोलिसांची अादिवासींना अनाेखी वस्तूंची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; आदिवासी पाड्यांवरील गरिबांची दिवाळी इतरांप्रमाणे आनंदात साजरी व्हावी, यासाठी काही डॉक्टरांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कलाकिरण फाउंडेशन नाशिक ग्रामीण पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने जमा करण्यात अालेल्या विविध वस्तूंचे वाटप आदिवासी भागांत करण्यात अाले. या अनाेख्या दिवाळी भेटीमुळे सामाजिक बांधिलकी तर जाेपासली गेलीच, पण गरीब आणि गरजूंना माेठा अाधारही मिळाला.
यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नागरिकांच्या एक वेळच्या जेवणाची स्थितीदेखील गंभीर बनली आहे. त्यातच आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात तर अधिकच बिकट चित्र आहे. याचाच विचार करीत नाशिकमधील डॉ. किशोर मुळे यांनी स्थापन केेलेल्या कलाकिरण फाउंडेशन आणि नाशिक ग्रामीण पोलिसांच्या मदतीने या गरजूंच्या मदतीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात अाला. त्यानुसार कलाकिरण फाउंडेशनच्या वतीने शहरातील नागरिकांना या गरजूंना मदतीसाठी आवाहन करण्यात अाले.
शहरवासीयांनी त्यांना माेठ्या संख्येने कपडे, भांडी, खेळणी, वह्या, पुस्तके, पलंग, कपाट, ताडपत्री, टीव्ही, टेपरेकॉर्डर, ब्लँकेट, स्वेटर्स, घड्याळ अशी तीन हजार व्यक्तींना पुरतील इतक्या संसारोपयोगी वस्तूंची मदत केली. या वस्तूंच्या माध्यमातून अादिवासी भागातील, तसेच नक्षली भागातील उपेक्षितांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा मानस फाउंडेशनने व्यक्त केला. सहायक पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनीही या उपक्रमाचे काैतुक करतानाच त्यास समाजातून अधिकाधिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हे सर्व साहित्य नागरिकांकडून डॉ. रेवती मुळे, डॉ. श्याम पगार, निकेतन मिसाळ, विजय कोल्हे, अभिषेक कुलकर्णी, हेमंत पोतदार, गौरव जाधव, स्वप्नील जोशी, प्रज्ञा सावळे, मनोज सावळे, अजय पाटील, पोपट चौधरी, दिलीप पवार, सुनील येवले, योगेश कोठावदे, मनोहर भावनाथ, शर्विन मुळे, डॉ. नरेंद्र गुप्ता, डॉ. हेमराज बढे, महेश थोरात, अमाेल घुगे आदींनी जमा करून समाजभान जपले.
कलाकिरण फाउंडेशन ग्रामीण पाेलिसांच्या पुढाकारातून अादिवासी बांधवांसाठी पाठवण्यात अालेले साहित्य.

गडदवणेतील ५०० बांधवांना केले वाटप
फाउंडेशननेप्रथम टप्प्यात पोलिसांच्या व्हॅनद्वारे हे सर्व जमा केलेले साहित्य हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथील गडदवणे या पाड्यावरील ५०० अादिवासी बांधवांना वाटप केले. आता पुढील टप्प्यात गडचिरोलीतील आदिवासींनादेखील जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात अाले.