आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ; 6 जण नाशिक सिव्हिलमध्ये दाखल, 10 जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड (नाशिक)- मनमाडपासून जवळ असलेल्या रापली येथे आणि शहर परिसरात मोकाट कुत्र्यांनी आज धुमाकूळ घातला. सुमारे 10 जणांना या कुत्र्यांनी चावा घेतला. यापैकी 6  जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींचे तर कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
कुत्र्यांनी चावा घेतलेल्यापैकी काहींना गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर जखमींना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. मोकाट कुत्र्याचा पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...