आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थनगरमध्ये कुत्र्यांना कोंडले मंदिरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- सिंहस्थनगरमध्ये गुरुवारी चार-पाच मोकाट कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला करीत काही नागरिकांना जखमी केले. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी कुत्र्यांना मंदिरात कोंडून ठेवले.

सायंकाळी या कुत्र्यांनी काही पादचार्‍यांना जखमी केले. त्यात दिनेश निकम, राजू कांबळे, सानप, रुणकर आदी जखमी झाले. कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न करूनही ते जुमानत नसल्याने अखेर नागरिकांनी त्यांना मंदिरात बंद केले. महापालिकेकडे या संदर्भात तत्काळ तक्रार करण्यात आली. परिसरातील पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी विशाल सांगळे, बाळा दराडे, रवी चव्हाण, दत्तू जेजूरकर, नीलेश पावसे आदींनी केली आहे.