आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसाळलेल्या श्वानाचा सिडकोत आठ बालकांसह अनेकांना चावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/ सिडको - पिसाळलेल्याश्वानाने मंगळवारी दुपारी ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत दिसेल त्याला चावा घेत सिडकोमध्ये धुमाकूळ घातला. या श्वानाने आठ बालकांसह काही नागरिकांना दंश करून जखमी केले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने या श्वानाला मोठे धाडस करून पकडले. त्यानंतर हे थरारनाट्य संपुष्टात आले.
जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील एक बालिका गंभीर आहे. या घटनेमुळे सिडकोवासीय दहशतीखाली असून, मोकाट श्वानांचा बदोबस्त करण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे.
सिडको परिसरात या श्वानाने अक्षरश: धुमाकूळ घातला. या श्वानाने प्रिया हांडे (वय १० ) या बालिकेच्या पायाला चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. तसेच, श्रिया दुर्वे (२), सचिन लखन ढाकणे (३), नेहा ज्ञानेश्वर साळवे (५), साई क्षीरसागर (६), ऊर्वशी शिंदे (६), किक्री शेख (७) सक्षम शेटे (८ ) ही बालके तसेच तेजस अतुल गोटी (वय १८) ढेंगे यांच्यासह काही नागरिकांना चावा घेतला. यामध्ये एक मनपा कर्मचाऱ्याच्या मुलीचा समावेश आहे. उपमहापौर गुरुमित बग्गा, विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जखमींची चौकशी केली. मोकाट श्वानांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आरोग्य विभागाला आदेश
श्वानमारण्याचे निर्बंध आहेत. आरोग्य विभागाला मोकाट श्वान पकडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गंभीर विषय आहे. नक्की ठोस कारवाई केली जाईल. गुरुमित्तबग्गा, उपमहापौर
प्रिया हांडे
प्रिया हांडे या बालिकेच्या गुडघ्याचा श्वानाने चावा घेतल्याने मोठी जखम झाली.

चार दिवसांत दुसरी घटना
चारदिवसांपूर्वी गंगापूर परिसरात सहा मुलांना पिसाळलेल्या श्वानाने गंभीर जखमी केले होते. त्यानंतर सिडको परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. महिन्यापूर्वी लाखलगाव शिवारातही पिसाळलेल्या श्वानाने पहाटेच्या सुमारास अकरा नागरिकांना लक्ष्य केले होते.