नाशिक- पिसाळलेल्या श्वानाने समोर दिसेल त्यास चावा घेतल्याने लाखलगाव परिसरात आठ जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, यामध्ये बहुतांश वृद्धांचा समावेश आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास या श्वानाने सोमनाथ माधव साळुंखे, समाधान उत्तम बदादे, खंडू देवराम भड, पांडू फकिरा गबाळे, भावराव गोपीनाथ साळुंखे, शांताबाई गणपत गोधडे, सगुणाबाई बापूराव शेलार व बाबूराव गोटीराम शेलार यांना चावा घेतला. संतप्त ग्रामस्थांनी या श्वानास ठेचून मारले.