आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वान निर्बीजीकरणासाठी 75 लाख रुपयांचे कंत्राट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील कुत्र्यांची वाढती संख्या व माणसांवरील हल्ले लक्षात घेऊन 75 लाख रूपयांचे श्वान निर्बीजीकरणाचे कंत्राट पुन्हा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, 17 रोजी महासभेवर प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी उद्गीर येथील एका संस्थेला श्वान निर्बीजीकरणाचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कुत्र्यांकडून हल्ले करण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे संबंधित संस्थेकडून चांगले काम होत नसल्याचा निष्कर्ष काढत नवीन कंत्राट दिले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.