आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसाळलेल्या श्वानाचा बालिकेवर हल्ला, श्वानमालकावर कारवाईची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - पवननगर येथील सप्तशृंगी चौकात बुधवारी सायंकाळी आठवर्षीय बालिकेवर पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केला. हा श्वान पाळीव असल्याने श्वानमालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. या श्वानाने बालिकेच्या पाठीला चावा घेतला. बालिकेने आरडाआेरड केल्याने श्वानाने धूम ठाेकली.
परी प्रणव मोरे ही खाऊ घेण्यासाठी दुकानात जात असताना कोळी नामक व्यक्तीने पाळलेल्या श्वानाने धावत येत परीच्या पाठीचा चावा घेतला. याच श्वानाने यापूर्वीही अनेकांना चावा घेतल्याचा याबाबत तक्रार केल्यास काेळी कुटुंब तक्रार करणा-यांवरच दादागिरी करत असल्याचा नागरिकांनी आराेप केला आहे. काेळी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रणव मोरे सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील यांनी केली आहे. पालिकेच्या रुग्णालयात या बालिकेवर उपचार करण्यात आले.