आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात भटक्‍या कुत्र्यांची दहशत; 25-30 नागरिकांवर हल्ला, परिसरात दहशत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नाशिक - नवीन नाशिक अर्थात सिडको भागात असलेल्या नागरी वस्तीत उत्तम नगर येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी नागरिक आणि चिमुकल्यासह 25 ते 30 जणांवर हल्ला केला आहे. यामध्ये २५ नागरिक जखमी झाले असून त्यापैकी 6 जण गंभीर आहेत.
 
जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांत विशेषतः लहान मुले आणि महिलांमध्ये दहशत पसरली आहे. सध्‍या सुट्टीचे दिवस असल्याने अनेक लहान मुले या परिसरात खेळत असतात. अशात पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

केवळ या ठिकाणीच नव्हे, तर संपूर्ण नाशकात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. गाडी चालवताना देखील अनेकदा कुत्र्यांमुळे अपघात घडले आहेत. प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. 
 
गंभीर जखमींची नावे...  
. प्राजक्ता प्रकाश काबदे, वय  ५ वर्षे

. साई सोपान पाटील, ३ वर्षे

३. चेतना अशोक पाटील, दीड वर्षे

४. किशोर मोरे, ३९ वर्षे
 
५. रोहित पाटील, 7 वर्षे

६. साहिल वाघ, ४ वर्षे
बातम्या आणखी आहेत...