आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वान गणना, पालिकेला सर्वेक्षक मिळेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील भटक्या श्वानांच्या उच्छादामुळे त्रस्त झालेल्या महापालिकेने आता त्यांची नेमकी संख्या किती, हे शोधण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने पालिकेला तंत्रशुद्ध सर्वेक्षकांचा बोधच होत नसल्याने प्रस्ताव तूर्त बासनातच आहेे. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी आरोग्य विभागाने ढाेबळपणे केलेल्या सर्वेक्षणात शहरात ३५ हजार श्वान आढळले होते.
मोकाट श्वानांच्या उपद्रवाबाबत आरोग्य विभागाकडे तक्रारी वाढत आहेत. मध्यंतरी एका श्वानाने िसडको परिसरात उच्छाद मांडल्यानंतर आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह लागले होते. दरम्यान, कोणत्याही उपाययोजना करण्यापूर्वी श्वानांची नेमकी संख्या किती, हे समजण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा श्वानगणनेसाठी सर्वेक्षणाचा विचार सुरू केला आहे. आरोग्य विभागाने राज्यातील शेजारच्या राज्यातील काही महापालिकांकडून अभिप्राय मागितल्यावर अशा पद्धतीने श्वानांच्या सर्वेक्षणाचे प्रयत्न झाले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे श्वानांचे सर्वेक्षण करायचे कसे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

पाळीवश्वानांना मोकळीक : पालिकेकडे८४० पाळीव श्वानांची नोंद असून, या श्वानांचे रेबिज प्रतिबंधक लसीकरण होते का, याची माहिती नाही, तसेच या श्वानांची माहिती घेण्याचा अधिकारही आरोग्य विभागाला नाही. पाळीव श्वानाने दंश केल्यास त्याच्या मालकाविरोधात तक्रार करण्याची सोय नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यासंदर्भातील उपविधी शासनाकडे धूळखात पडून आहे.

एकमादी सुटली तर २० पिले सुटतात : आरोग्यविभागातील सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वेक्षणात अनेक तांत्रिक बाबी अडचणीच्या ठरत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एक मादी सुटली ती प्रसूतीच्या मार्गावर असेल तर जवळपास २० पिलांची गणती सुटली असे गृहीत धरावे लागते, असेही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.