आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरगुती गॅसवर कमाईचा धंदा, अवैध वापराबाबत तपास करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गॅस सिलिंडरचा काळाबाजार राेखण्यासाठी केंद्र सरकारने गांभीर्याने पावले उचलली असून, कडक नियम करण्याबराेबरच वितरण धाेरणातही काही बदल केले अाहेत. जिल्हा पुरवठा विभागानेदेखील गॅस सिलिंडरच्या अवैध वापराबाबत कडक धाेरण अवलंबले अाहे. मात्र, विभागाकडून विशेष पथकांची नियुक्तीच केली गेली नसल्याने, तसेच नियमितपणे कारवाई हाेत नसल्याने व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचाच अवैधरित्या वापर सुरू असल्याचे दिसून येते. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात दाखल हाेणाऱ्या भाविकांच्या पाेटपूजेसाठी शहरात अनेकांनी खाद्यपदार्थांचे गाडे, खानावळी, हाॅटेल्स सुरू केले अाहेत. याठिकाणी अनेकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचाच वापर करून अधिक उत्पन्न कमावण्यावर भर दिला जात अाहे. त्याचबराेबर वाहनांसाठीदेखील घरगुती गॅस सिलिंडरचा वापर सुरूच असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले अाहे.

गेल्या वर्षभरात अवैधरित्या सिलिंडरचा वापर करणाऱ्यांना अपघात झाल्याच्याही घटना घडल्या असून, काहींना प्राणही गमवावे लागले अाहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या वापरामुळे वाहनांचा स्फाेट हाेणे, अशा घटनाही घडतात. ‘डी. बी. स्टार’कडे अालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रतिनिधीने शहरात काही ठिकाणी पाहणी केली असता, काही खाद्यपदार्थ विक्रेते, तसेच वाहनचालकांकडून सर्रासपणे नियमांना धाब्यावर बसवत स्वत:चाही जीव धाेक्यात घालून घरगुती गॅस सिलिंडर वापरले जात असल्याचे दिसून अाले. हा सर्व प्रकार शहरात घडत असताना, ताे राेखण्याची जबाबदारी असलेल्या पुरवठा ‌खात्यातील अधिकाऱ्यांनी मात्र अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत हातावर हात धरून बसण्याचीच भूमिका स्वीकारल्याचे दिसून अाले. पथकाकडून वर्षभरात काेणत्याही प्रकारची विशेष माेहीम राबवण्यात अाली नसून, केवळ सहाच प्रकरणांत कारवाई करण्यात अाली. प्रतिनिधीने वर्षभरातील या कारवायांबाबत अधिक माहिती पुरवठा अधिकाऱ्यांना विचारली असता, सिंहस्थात कामाचा व्याप वाढल्याने गॅस सिलिंडर कारवाईबाबत लगेचच माहिती देता येणार नाही. दाेन ते तीन दिवसांनंतर सविस्तर माहिती देताे, असे माेघम उत्तर देण्यात अाले.

अशी लढवली जाते शक्कल...
गॅसच्याअवैध वापराबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, अनेकदा गॅस सिलिंडर वितरणात कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप बनावट पत्ते देऊन एकाच घरातील एकापेक्षा अनेक गॅस कनेक्शन यास कारणीभूत असल्याचे दिसून येते. काही रहिवाशांंकडूनही त्यांचे गॅस सिलिंडर वाहनधारकांना पुरविण्यात येत असल्याचे दिसून अाले. गॅस कंपन्यांच्या सर्वेक्षणातही ही बाब अाढळून अाली अाहे.

संयुक्त बैठक गरजेची...
^पुरवठा खात्याने पाेलिसांशी सातत्याने संपर्क साधल्यास घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर संयुक्तपणे अाणि अधिक कडक कारवाई करता येईल. एखादी तक्रार अाल्यास पाेलिसांना त्वरित कारवाई करावी लागते. विशेष म्हणजे, तक्रार अाल्यावर अाम्ही पुरवठा खात्याचे अधिकारी येण्याची वाट पहात बसलाे तर कारवाईत विलंब हाेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे सर्व टाळण्यासाठी वेळाेवेळी संयुक्तपणे बैठक घेण्याची गरज अाहे. विजयपाटील, पाेलिस उपायुक्त, नाशिक

गाेरक्षनाथ गाडीलकर, जिल्हापुरवठा अधिकारी
वर्षभरात फक्त सहाच कारवाया
घरगुतीगॅसच्या काळ्या बाजारावर नियंत्रण अाणण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या जिल्हा पुरवठा खात्याने वर्षभरात केवळ सहाच प्रकरणांत कारवाई केलेली अाहे. विशेष म्हणजे, अवैध वापराबाबत सातत्याने कारवाई करण्यासाठी विभागाकडे मनुष्यबळाची माेठ्या प्रमाणावर कमतरता असल्याचे सांगत याकामी विशेष पथकाची नियुक्तीच केली गेली नसल्याचे पुरवठा खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांनीच सांगितले. त्यामुळे शहरातील हाॅटेल, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच, वाहनांत गॅस भरण्याच्या संशयित ठिकाणी विभागाकडून वर्षातून एखाद्याच वेळेस तपासणी केली जाते.

पाेलिसच कारवाई करून माेकळे
जिल्हापुरवठा विभागाकडे कारवाईचे मुख्य अधिकार असताना पाेलिसच अनेकदा कारवाई करून माेकळे हाेतात. अनेक कारवाया तर पाेलिसांकडून दडपल्यादेखील जात असल्याचा अाराेप पुरवठा खात्याकडून करण्यात अाला. ‘डी.बी. स्टार’ प्रतिनिधीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, याबाबत सांगण्यात अाले.
नियम काय सांगताे...?
एल.पी. जी. हे स्वयंपाकासाठी एक अत्यंत सुरक्षित, स्वस्त, पर्यावरणस्नेही अाणि निराेगी इंधन मानले जाते. देशातील लाेकसंख्येनुसार एल. पी. जी. गॅसला सातत्याने मागणी वाढत अाहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला गॅस सिलिंडर सहजपणे उपलब्ध व्हावे, यासाठी एल. पी. जी. नियमन अादेशान्वये घरगुती एल. पी. जी. गॅसचा वापर कुठलीही माेटार वाहने किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापर करण्यावर बंदी करण्यात अाली अाहे. त्याचबराेबर नुकताच के. वाय. सी.मुळे एका व्यक्तीकडे एकच गॅस सिलिंडर असाही नियम लागू करण्यात अाला अाहे. या गॅसला सरकारकडून सबसिडी दिली जाते. त्याचा माेठा भुर्दंड सरकारला साेसावा लागताे. मात्र, तरीदेखील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुलनेत घरगुती गॅस हा कमी किमतीत मिळत असल्याकारणाने विविध व्यावसायिक त्याचा गैरवापर करतात. परिणामी, घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांना अनेकदा सिलिंडर मिळण्यात अडचणी निर्माण हाेतात. अाजघडीला शहरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यातच गॅसचा माेठ्या प्रमाणात काळाबाजार हाेत अाहे.

कारवाईचे ठिकाण
{सुभाषराेड,नाशिकराेड
{सिन्नरफाटा, नाशिकराेड
{जयभवानी, नाशिकराेड
{सिडकाे
{नानावली, जुने नाशिक
येथे अवैध वापर
{खाद्यपदार्थिवक्रेते
{चहा विक्रेते
{चारचाकी वाहने
{गॅस गिझर वापरणारे
{इतर काही
शहरातील अनेक खाद्यपदार्थ विक्रेते, वाहनचालकांकडून हाेताेय घरगुती गॅस सिलिंडरचा वापर; मनुष्यबळाअभावी पुरवठा खात्याकडून कारवाई करण्यात दिरंगाई
‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत शहरातील अनेक ठिकाणी दिसून अाला अवैध वापर
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात दाखल हाेणाऱ्या भाविकांच्या पाेटपूजेसाठी अनेकांनी खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय थाटला अाहे. मात्र, यासाठी अनेकांकडून सर्रासपणे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात अाहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमती कमी हाेऊनही विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांकडून सर्रासपणे घरगुती गॅस सिलिंडरच वापरले जात असल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाली अाहे. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून मात्र अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत हातावर हात धरून बसण्यापलिकडे कुठलीही भूमिका घेतली जात नसल्याने अवैधरित्या कमाईचा धंदा जाेरात सुरू अाहे. एकीकडे केंद्र शासनाने कठाेर पावले उचलली असताना, जिल्हा पुरवठा खात्याकडून मात्र पथकही नेमण्यात अाले नसून, वर्षभरात केवळ सहाच प्रकरणांत कारवाई करण्यात अाली अाहे.
{ शहरातअनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधपणे वापर सुरू अाहे. याबाबत माहिती अाहे काय?
अामच्याकडेअद्यापपर्यंत कुणाचीही तक्रार अालेली नाही. परंतु, अशा प्रकारे घरगुती गॅसचा अवैध वापर सुरू असल्यास तातडीने तपासणी करणार.

{ गॅसच्याअवैध वापराचा तपास अापण कधी, केव्हा कशाप्रकारे करतात?
अधूनमधूनशहरातील हाॅटेल, खाद्यपदार्थ विक्रेते यांची तपासणी केली जाते. यात दाेषी अाढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाते.

{अातापर्यंत कितीजणांवरकारवाई केली अाहे?
सध्यामला याबाबत सविस्तर माहिती नाही. परंतु, कार्यालयातून माहिती घेऊन सांगू शकेल.