आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Donation Process For Kalaram Mandir Is Now Online

श्री काळारामाचे दर्शन, दान अाता ऑनलाइन, तीन्ही मूर्तींना १० तोळ्यांचा सुवर्णहार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य अाणि रामायणकालीन संदर्भांमुळे नाशिकचे पाैराणिक स्थान अनन्यसाधारण अाहे. ते अधाेरेखित करत पेशवेकाळात उभारण्यात अालेल्या पुरातन काळाराम मंिदराचे दर्शन देश-विदेशातील भाविकांना आता ऑनलाइन घेता येईल.
त्याबराेबरच अाॅनलाइन देणगीही देता येईल. त्यासाठी संस्थानतर्फे http://shrikalaramsansthan. nashik.org हे संकेतस्थळ विकसित करण्यात अाले अाहे. या सेवांसाठी संस्थानतर्फे कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही. संकेतस्थळावर संस्थानची माहिती, ऑनलाइन दर्शन आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात (क्रमांक ३५१८५५१७९९३) ऑनलाइन दान कसे देता येईल. याबाबत माहिती देण्यात आली आहे. रविवारी या संकेतस्थळाचे उद््घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष एन. बी. बोस यांच्या हस्ते झाले.

या मंिदरातील श्रीराम, सीता अाणि लक्ष्मण मूर्तीसाठी प्रत्येकी दहा तोळ्याचे सुवर्णहार बनविण्यात येणार अाहेत. सन १७९२ नंतर प्रथमच साेन्याचे दागिने बनविण्याचा िनर्णय घेण्यात अाला असून दान म्हणून प्राप्त सोन्यातून ते तयार करण्यात येतील.