आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुषारसाठी मदत : एनआरआयही सरसावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त तुषार कासारला देशभरातील दात्यांकडून मदतीचा ओघ सुरूच असून आता अनिवासी भारतीयांनीही त्याच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. येवल्याहून र्जमनीला नोकरीनिमित्त गेलेल्या पीयूष विजय छाजेड यांनी 5 हजार रुपयांची मदत दिली. त्यांचे बंधू मिलन लुणावत यांनी हा निधी तुषारच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. एचएएल कामगारांनी उत्स्फूर्तपणे मदत दिली.
जन्मत:च मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासलेल्या तुषार कासारच्या शस्त्रक्रियेबाबतची बातमी ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केली होती. भारावलेल्या वाचकांनी तुषारसाठी भरभरून मदत निधी पाठवला. दोन आठवड्यांतच या निधीने 5 लाखांचा आकडा ओलांडला आहे. एचएएल कर्मचार्‍यांनीही सामाजिक जाणीवेच्या भावनेतून आपापल्या विभागात तुषारच्या बातमीचे कात्रण चिटकवले. या माध्यमातून शिरीष देशमुख, सुरेश आहिरे, अमोल बोरकुट यांनी तुषारच्या पालकांकडे सुपूर्द केला. याशिवाय गोळे कॉलनीमधील व्यापारी आणि कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन 5 हजारांची मदत संकलित केली. यात गोपाळ कासार, भारत कासार, बंडोपंत काळे, जयंत काळे, सचिन कासार, कमलेश कासार आदींचा समावेश आहे. नाशिकरोड येथील चलार्थ पत्र मुद्रणालयाच्या स्टोअर-1 मित्रमंडळाने 11 हजार 500 रुपयांचा निधी संकलित केला.
कॅडेटने जमवले 7600 रुपये
औरंगाबाद : तुषारच्या शस्त्रक्रियेसाठी औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने 7 हजार 600 रुपयांची मदत जमा केली आहे. संस्थेच्या कर्मचार्‍यांसह सैन्यात अधिकारी बनण्यासाठी आलेल्या कॅडेट्सनेही मदतीचा हात दिला. संस्थेचे संचालक मेजर चंद्रसेन कुलथे, अधीक्षक रवी भुरचंडी, गृहपाल राजू मानेकर, प्रकाश कुलकर्णी, कॅप्टन पुष्कर कुलकर्णी, कोर्स हार्दिक देसाई व अनिल गोरे आदींनी मदत गोळा केली.
मदतीबद्दल सर्वांचे आभार, आता मदत नको
उपचारासाठी पुरेसा निधी संकलित झाल्याने यापुढे कुणी मदत देऊ नये तसेच रुग्णालयात शांतता राखण्यासाठी मोबाइलवर संपर्क न साधण्याची अपेक्षा कासार कुटुबीयांनी व्यक्त केली आहे.
तुषारच्या मदतीसाठी सरसावलेले औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचे कर्मचारी आणि कॅडेट्स