आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don't Consider Us, If Do We Disclose Internal Things Raj Thakare

मला गृहीत धराल, तर तुमचा भंडाफोड करीन - राज ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आपल्याला गृहीत धरून ऊठसूट महायुतीच्या वावड्या उठविल्या जात आहेत. यासंदर्भात पक्षप्रमुख या नात्याने मीच निर्णय घेणार आहे, आपल्याशी चर्चा न करता परस्पर तिसरा-चौथा भिडू म्हणून मनसेचे नाव घेतले तर शेवटचे सांगतो, या चर्चा बंद करा, नाहीतर यापूर्वी झालेल्या गुपित चर्चा उघड करीन, असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिला.


दोन दिवसांपासून नाशिक दौर्‍यावर असलेल्या राज ‘राजगड’ कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आपली भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत येण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मनसे चौथा भिडू झाला तर चौथेच होईल, अशी टीका केली. यावर राज म्हणाले, कोणी काहीही चर्चा करू दे. युतीत जायचे की नाही अथवा जो काही निर्णय घ्यायचा तो मलाच घ्यायचा आहे. आमच्या पक्षाच्या भवितव्याची काळजी इतरांना कशाला हवी? असा सवाल करून युतीची चर्चा करणार्‍यांनी त्यांच्या पक्षाचे बघावे, असा टोला लगावला. भाजपा-शिवसेना-रिपाइं नेत्यांची नावे न घेता त्यांना उद्देशून यापुढे चर्चा बंद झाल्या नाहीतर त्यांनी माझ्याशी यापूर्वी केलेल्या गुपित चर्चा उघड करीन, असा इशारा राज यांनी दिला.