आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूरदर्शन दाखविल्यास केबलचालकांवर कारवाई; स्टार आणि प्रसारभारतीच्या वादावर उद्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केबल कंपन्यांनी जाहीर केलेली आपली महागडी पॅकेजेस ग्राहकांनी घ्यावीत, यासाठी दूरदर्शनचे सिग्नल बंद करत ग्राहकांची फसवणूक सुरू केली आहे. त्यावर आता अपर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कारवाईचा इशारा दिला असून, असा उद्योग केबलचालक करीत असल्यास ग्राहकांनी तक्रार करण्याचे आवाहन केले.
केबल कंपन्या किंवा डीटीएच कंपन्यांना दूरदर्शनच्या वाहिन्या मोफत दाखविण्याचे आदेश शासन आणि न्यायालयाने दिले आहेत. परंतु, दूरदर्शनवर क्रिकेट वर्ल्डकपचे भारताचे सामने दाखविले जात आहेत. त्यामुळे त्यांचे सिग्नलच वीक करण्यात येत आहेत. दूरदर्शनवर वर्ल्डकपमधील भारताचे सामने दाखविले जात असल्याने ग्राहक ही महागडी पॅकेजेस घेण्याऐवजी दूरदर्शनवर भारताचे सामने दिसत असल्याने त्यातच आनंद लुटत आहेत. त्यामुळे अधिक दराची साधारणत: २७५ रुपयांपासून पुढच्याच पॅकेजमध्ये या वाहिन्यांचा समावेश केला आहे. त्याचे कारण देताना बहुतांशी चॅनल्स पे असल्यानेच त्यांचे दर अधिक आकारले जातात, असे एमएसओ सांगत असून, ब्रॉडकास्टर्सही एमएसओंच्या माध्यमातून ग्राहकांना वेठीस धरण्याचेच काम करीत आहेत.

उद्याचित्र स्पष्ट होणार : वर्ल्डकपचे अधिकार स्टार स्पोर्ट‌्सने घेतल्यामुळे दूरदर्शनवर सामने दाखवू नयेत, अशी तक्रार स्टारने न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर प्रसारभारतीने ते दाखवावे, अशी मागणी केली आहे. याबाबत १७ फेब्रुवारीला उच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी घेत सध्याचीच स्थिती १९ फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश दिल्यानुसार, गुरुवारी निर्णय होणार असल्याने रविवारचा भारत-दक्षिण आफ्रिकेचा सामनाही दिसणार की नाही, याचे चित्र गुरुवारीच स्पष्ट होईल.

..तर हाथवेशी करा संपर्क

^हाथवे कंपनीकडून दूरदर्शनचे सिग्नल बंद केले जात नाहीत.कुठलीही तक्रार असल्यास हाथवेच्या कालिका मंदिराशेजारील साखला मॉल येथील कार्यालयात तक्रार करावी. शरदगामणे, ऑपरेशन मॅनेजर

चौदा चालकांचे प्रक्षेपण बंदच
करमणूक कर भरल्याने २१ केबलचालकांचे प्रक्षेपण बंदच करण्याची कारवाई जिल्हा करमणूक विभागाने केली होती. त्यानंतर सात जणांनी कर भरला. त्यांचे प्रक्षेपण सुरू झाले असून, १४ जणांचे अद्यापही प्रक्षेपण ऐन क्रिकेट वर्ल्डकपच्या काळातच बंद आहे.

^दूरदर्शनचे सर्व चॅनल्स केबलचालकांना दाखविणे बंधनकारक आहे. ते जर एेन िक्रकेटच्या सामन्यांच्यावेळी दूरदर्शन दाखवत नसतील तर कारवाई केली जाईल. ग्राहकांनी तक्रार करावी. त्याची दखल घेतली जाईल. भानुदासपालवे, अपर जिल्हाधिकारी