आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांधकामांवर अाता दुहेरी विकास शुल्काचाही भार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रीय हरित लवादाचा अडसर, कपाटाचे भिजत पडलेले घाेेंगडे मंदीमुळे अाधीच अडचणीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकांबराेबर सामान्य विकसकांच्याही ताेंडचे पाणी अाता टीडीअार सुविधा सुधारणा कर अर्थातच टीडीअार इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंटच्या अाकारणीमुळे पळणार अाहे. इमारतीसाठी अाकारल्या जाणाऱ्या विकास शुल्काबराेबरच कमीत कमी छाेट्या रस्त्याचा विचार करता येथील एक हजार चाैरस मीटर भूखंडावर नियमानुसार ४० टक्के, अर्थातच चारशे चाैरस मीटर टीडीअार लाेड केल्यास साधारण चार लाख रुपयांपर्यंत रक्कम या कराच्या नावाखाली माेजावी लागणार अाहे. या कराचा चांगला परिणाम महापालिकेचे उत्पन्न वाढण्यात हाेणार असला तरी, घरांच्या किंमती मात्र यामुळे वाढणार अाहेत.

गेल्या तीन वर्षांपासून बांधकाम क्षेत्र मंदीचा सामना करीत अाहे. शहरात अाजघडीला दाेन-अडीच हजार इमारती पूर्णत्वाच्या मार्गावर असून अनेक इमारतीतील सदनिका विकल्या गेलेल्या नाहीत. मध्यंतरी वाढलेल्या बांधकाम खर्चामुळे बांधकाम व्यावासायिकांना किंमती करणे म्हणजे खिशाला चाट देऊन व्यवसाय करण्यासारखे झाले अाहे. त्यात राज्य शासनाच्या नवीन धाेरणामुळे जिना, पॅसेजसारख्या अशा पूर्वीच्या माेफत बाबींवर महापालिकेला प्रीमियम देणे अनिवार्य झाले अाहे. एवढे करूनही ग्राहक मिळण्याची शाश्वती नाही. त्यात कपाट क्षेत्राच्या नियमनाच्या मुद्यावरून ग्राहक संभ्रमित झाला अाहे. कपाट क्षेत्र नियमनाबाबत महापालिकेकडे जवळपास अडीच हजार प्रकरणे पडून असून, या सर्वांबाबत नेमके काय करायचे याचा निर्णय राज्य शासनाच्या काेर्टात पाठवला अाहे. नवीन विकास नियमावली लागू झाल्यानंतर त्यात कपाट क्षेत्र नियमित करण्याबाबत विचार हाेईल अशी कारणे सांगून व्यावसायिक अवलंबित ग्राहकांच्या पदरात प्रतीक्षेशिवाय काहीही पडले नाही. अशात अाता पुन्हा नव्या कर अाकारणीमुळे डाेकेदुखी वाढणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...