आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...मग जातीय दहशतवादाचा पुरस्कार का?; डॉ.दाभोळकरांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जातपंचायत व्यवस्था ही संविधानाने दिलेले नागरिकत्वच हिरावून घेत असल्याचे जळजळीत वास्तव अंधर्शध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडले.

जात ही राजकारणाचा प्रमुख आधार बनू पाहत आहे. वास्तविक, ‘जात अन् राजकारण’ या दोन वेगवेगळ्या संकल्पना असून, त्यांचा लागेबंध दाखवून समाजातील घटकांचे शोषण करणार्‍या जातपंचायत व्यवस्थेला समूळ नष्ट करण्याची गरज आहे. हे काम अवघड असले, तरी जातपंचायत मूठमाती परिषदेच्या माध्यमातून राज्यभर प्रबोधन करून समतेचं रोपटं लावणार असल्याचेही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

आंतरजातीय विवाह केल्याचा राग आवळून जन्मदात्या बापानेच मुलीचा गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची घटना अंगावर शहारे आणणारी आहे. जातपंचायत व्यवस्था ही जातीने निर्माण केलेली मानसिक गुलामगिरी आहे. जात पंचायत व्यवस्था तुम्हाला तुमचे मत नाही, असा असंविधानिक फतवा काढून तुमच्यावर मत लादते. त्यामुळे जात पंचायतीविरुद्धचा हा लढा संविधानातील मूलतत्त्वाशी व लोकशाहीच्या गाभ्याशी असून, ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी मूठमाती परिषद प्रचार व प्रसार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.