आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Program In Nashik

क्रांतीची बिजे साहित्यात, डॉ. मोरे यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जातीग्रस्त माणसाची आजची अवस्था ही त्यानेच निर्माण केली आहे आणि ती अवस्था तोच मोडू शकतो. त्यासाठी साहित्याच्या माध्यमातूनच क्रांतीची बिजे पडू शकतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. मूकनायक ते महानायक प्रवास केलेल्या डॉ. आंबेडकरांच्या समता व संघर्षाच्या विचारांनी माणसाला अभिव्यक्त होण्याची शक्ती दिली, असेही ते म्हणाले.
यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित लोकसंवाद सत्र व बाबुराव बागुल कथा लेखन पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तविक जीवनातील विचारशैली नंतरच्या काळात कुठल्याही प्रकारच्या साहित्य कृतीतून प्रतिबिंबित होऊ शकली नाही, अशी खंत डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. भारतीय साहित्याला सैद्धांतिक चौकट आहे. त्यातील नायक हा त्याच्या वर्णनानुसार पुढे आला. परंतु, दलित साहित्याने ही परंपरा मोडली व बहिष्कृत समाजाला नायकपद देऊ केले. नवोदित लेखकांनी बाबासाहेबांचा प्रवास साहित्याच्या लेखनीतून मांडावा, अशी अपेक्षादेखील त्यांनी या वेळी व्यक्त केली.