आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटनाकारांना अभिप्रेत राष्ट्र घडवूया, व्याख्यानांसह विविध उपक्रमांद्वारे महामानवाच्या कार्याला उजाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनानिमित्त शुक्रवारी शहरासह सातपूर, सिडको, नाशिकरोड परिसरात पक्ष, संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाविषयी मैत्रिभाव वृद्धिंगत करून राष्ट्रभावनेची गरज प्रतिपादित करण्यात आली.
नाशिकरोडला वंदन
नाशिकरोड येथे महापालिका, विविध पक्ष, सामाजिक संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले. महापालिकेतर्फे महापौर अँड. यतिन वाघ, प्रभाग सभापती सुनीता कोठुळे, विभागीय अधिकारी मीना हांडोरे, उत्सव समितीतर्फे अध्यक्ष जाबीर पठाण, नगरसेवक सुनील वाघ आदींनी अभिवादन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन चिडे, शिवाजी भोर, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, नाजाबाई सोनवणे, रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष मिलिंद सोनवणे, मनोहर रूपवते, नगरसेवक शैलेश ढगे, आंबेडकर बॅँकेचे अध्यक्ष अँड. राजेंद्र चंद्रमोरे, भिका गांगुर्डे यांनी अभिवादन केले.