आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Prakash And Dr. Manda Amet Interview In Marathi

साधे जीवन, हीच ओळख- ज्येष्ठसमाजसेवक डॉ. प्रकाश डॉ. मंदा आमटे याचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आदिवासींची जीवनशैली स्वीकारून जे आहे त्यातच समाधान मानत आनंदाने आयुष्यभर काम केले. साधी जीवनशैली हीच आमची ओळख असून, त्यातून आत्मिक समाधान मिळते, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश मंदा आमटे यांनी केले. महाकवी कालिदास कलामंदिरात शनिवारी ‘जीवन उत्सव -इंडियाकडून भारताकडे’ या कार्यक्रमातील मुलाखतप्रसंगी ते बाेलत होते.

नक्षलींचा प्रभाव असलेल्या गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात राहून आदिवासींना नव्या प्रकाशवाटा दाखवणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे डॉ. मंदा आमटे यांनी आनंदवन ते लोकबिरादरी प्रकल्प हा खडतर प्रवास या मुलाखतीतून उलगडला. श्रीकांत नावरेकर पराग मांधळे यांनी डॉ. आमटे दांपत्याची मुलाखत घेतली.

२४ ते ३० जानेवारीपर्यंत या जीवनशैली सप्ताहात विविध कार्यक्रम होणार असून, या सप्ताहाचे उद््घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे डॉ. मंदा आमटे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी ज्येष्ठ गांधीवादी समाजसेविका वासंती सौर, मुकुंद दीक्षित, रामदास गुजराथी हे मान्यवर उपस्थित होते. डॉ. आमटे म्हणाले की, नैतिक शक्तीचा परिणाम समाजावर होत असल्याने जाणीवपूर्वक श्रीमंतीच्या भौतिक सुखांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. हेमलकसातील आदिवासी आणि लोकबिरादरी प्रकल्प हा सजीवसृष्टीवरील सर्वांनाच शाश्वत राहण्याचा अधिकार देतो.

* साधी जीवनशैली तुम्ही कशी स्वीकारली?
कुष्ठरोग्यांच्याआयुष्यात आनंद पेरण्यासाठी बाबा आमटे यांनी अथक परिश्रम घेतले. आनंदवनाचे कार्य बघत असताना नकळत समाजसेवा करण्याचे संस्कार होत गेले. चौकटीत राहून आयुष्य जगता आपल्या शिक्षणाचा आदिवासींना फायदा व्हावा, यासाठी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. आदिवासींची संस्कृती आत्मसात करत साध्या राहणीमानातून त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविल्या. नागपूरमध्ये शिक्षण झाल्यानंतर जंगलात जाऊन आदिवासींमध्ये काम करण्याचा निर्णय हा बदल स्वीकारणारा असल्याचे डॉ. मंदा आमटे यांनी सांगितले.

*सर्वोत्तम जीवनशैलीचे चित्र तुम्ही कसे मांडाल?
दुर्गमभागातील आदिवासींचे जीवनशैलीपासून ते प्रगत देशांतील जीवनशैलीही अनुभवली आहे. भेदभाव करणारी जीवनशैली आयुष्य विशिष्ट चौकटीत मर्यादित करते. आम्ही आदिवासींची जीवनशैली आत्मसात करताना तेथील संस्कृती रुजवून घेतली. सार्वजनिक जीवनात नियमांचे पालन करणाऱ्या अन् कठीण प्रसंगी दुसऱ्यांच्या मदतीस धावून जाणाऱ्या साध्या राहणीमानाची जीवनशैली हीच सर्वोत्तम जीवनशैली आहे. मनापासून कामात मग्न राहिले की आनंदानुभूतीने समाधान मिळते.

*लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून कोणते प्रयोग केले?
आदिवासींना पहिल्यांदा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर आदिवासी भागातील मुलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी शाळा सुरू केली. कम्युनिटी लिव्हिंग हे आदिवासींचे बलस्थान असून, त्याचा वापर करत त्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. आदिवासींचे प्रबोधन करून अंधश्रद्धा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात विविध प्रयोग केले.

*सोशल मीडियाचा काय फायदा होत आहे?
बाबाआमटे यांची तिसरी पिढी उच्च शिक्षित असल्यामुळे टेक्नोसॅव्ही आहे. लोकबिरादरी प्रकल्पासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ असो की आर्थिक मदतीची साद सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरामधून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत कॉम्प्युटर प्रशिक्षकांची मदत लाभली आहे.
जीवन उत्सव कायक्रमाचे सूत कातून उद‌्घाटन करताना डॉ. प्रकाश बाबा आमटे मंदाताई आमटे.
समवेत ज्येष्ठ गांधीवादी समाजसेविका वासंतीताई सौर, मुकुल दीक्षित, संजय नार्वेकर.