आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य संपदेला लाभले मराठीचे कोंदण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘‘विचारसुद्धा मर्त्य असतात. ज्याप्रमाणे रोपट्यांना पाण्याची आवश्यकता असते, त्याप्रमाणे विचारांनासुद्धा प्रचार, प्रसाराची नितांत आवश्यकता आहे.’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे वक्तव्य प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य शासनाच्या डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने डॉ. आंबेडकर यांच्या साहित्याच्या २१ खंडांपैकी खंड क्रमांक एक आणि चार या दोन खंडांच्या मराठी अनुवादाचे काम पूर्ण केले असून, लवकरच ते वाचकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. याशिवाय एक ते २१ खंडांचे पुनर्मुद्रणाचेही काम समितीने हाती घेतले असून, त्यात नऊ आणि १६ क्रमांकाचा खंड येत्या १ मेपर्यंत उपलब्ध होणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओजस्वी साहित्याचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. मात्र. हे ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिण्यात आल्याने त्यातील विचार अजूनही तळागाळातील जनतेपर्यंत पूर्णत: पोहचले आहेत, याची शाश्वती कोणी देत नाही. हे काम १९८७ पासून शासनाच्या डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने हाती घेतले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या साहित्याच्या २१ खंडांचे मराठी अनुवाद करण्याचे काम समितीने काही वर्षांपासून हाती घेतले आहे. यापैकी यापूर्वी डाॅ. ंबेडकर यांच्या भाषणांचा समावेश असलेला १८ वा खंड तसेच डाॅ. ंबेडकर यांच्या पत्रकारितेची माहिती देणारा १९ व्या खंडाचे मराठीत अनुवाद करण्यात ला हाेता. उर्वरित खंडांचे अनुवाद मात्र बऱ्याच वर्षांपासून झालेले नाहीत. मात्र ता णखी दोन खंडांची मुद्रीत प्रत तयार झाली असून काही महिन्यातच ती वाचकांना उपलब्ध हाेणार आहे. याशिवाय १ ते २१ खंडांच्या पुनर्मुद्रणाचे कामही समितीच्या वतीने सुरू आहे. यातील नऊ क्रमांकाचा खंड (द काँग्रेस अँण्ड गांधी हॅव डन टू द अनटचेबल आणि मिस्टर गांधी अँण्ड द इमॅन्सिपेशन) तसेच १६ क्रमांकाचा खंड (पाली डिक्शनरी अॅण्ड ग्रामर) यांचे पुनर्मुद्रण पूर्णत्वास आले आहे. काही दिवसातच हे खंड बाजारात येतील, असे समितीचे सदस्य सचिव डॉ. अविनाश डोळस यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. या खंडाच्या प्रत्येकी पाच हजार प्रती तयार करण्यात आल्याचेही डोळस यांनी नमूद केले.

जातीय व्यवस्थेवर भाष्य करणारे पुस्तक मिळणार अवघ्या १५ रुपयांत : स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जात-पात तोडक मंडळाच्या वतीने १९३६ मध्ये लाहोरला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. आंबेडकर हे भूषविणार होते. ‘अॅन्हिलेशन ऑफ कास्ट्स’ या विषयावर डॉ. आंबेडकरांचे भाषण होणार असल्याने त्याची प्रत परिषदेपूर्वीच मागविण्यात आली. त्यात वेदांवर जहाल टीका करण्यात आली होती. त्यामुळे भाषणात फेरबदल करण्याची सूचना मंडळाच्या वतीने करण्यात आली. मात्र, आंबेडकर यांनी भाषण बदलण्यास नकार देत त्यातील स्वल्पविरामही बदलणार नाही, अशी भूमिका घेतली.

त्यामुळे मंडळाने ही परिषदच रद्द केली. जातीय व्यवस्थेबद्दलचे परखड विचार असलेल्या या भाषणाची प्रत मात्र सरकार दरबारी जपून ठेवण्यात आली. या प्रतीचे प्रा. प्रकाश शिरसाठ यांनी भाषांतर केले असून, त्याचे सुमारे ८० पानांचे पुस्तक तयार झाले आहे. हे पुस्तक अवघ्या १५ रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे या पुस्तकाच्या तब्बल
५० हजार प्रती छापण्यात आल्या आहेत.

अभ्यासकांसाठी सर्वाधिक उपयुक्त
बाबासाहेबांचे विचार समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत पोहचावेत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीने अनुवादित केलेले दोन खंड तसेच पुनर्मुद्रित केलेले दोन खंड मे महिन्यात बाजारात उपलब्ध होतील. संदर्भ ग्रंथांचाही अभ्यासकांना मोठा उपयोग होईल.
डॉ. अविनाश डोळस, सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती
दोन नवे संदर्भ खंड उपलब्ध
डॉ. आंबेडकर यांनी महाड येथे केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे दस्तावेज, न्यायालयात सादर झालेली कागदपत्रे, नोंदी आणि छायाचित्रेही संदर्भ साहित्य म्हणून समितीच्या वतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे. याशिवाय बाबासाहेबांच्या २० प्रकल्पांची माहिती असलेला खंडही प्रसिध्दीच्या उंबरठ्यावर आहे. यात नाशिकमधील काळाराम मंदिरातील सत्याग्रह, समता सैनिक दल, धर्मांतर सोहळा, गोलमेज परिषद आदी २० प्रकारच्या प्रकल्पांचा समावेश आहे.