आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनपेक्षित भेट अन् डॉ. कलाम यांचे आशीर्वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साधारणपाच वर्षांपूर्वी मुंबई ते दिल्ली असा विमानप्रवास करण्याचा याेग अाला. मुंबई विमानतळावर तिकीट काढण्यासाठी गेलो असता, इंडिगो कंपनीची एका स्कीमची माहिती समजली. नियमित तिकीट दरापेक्षा केवळ एक हजार रुपये जास्त भरून बिझिनेस टूरने प्रवास करण्याची संधी मिळत असल्याने त्याचा फायदा घेत मी आणि माझा मित्र उद्योजक निखिल बस्ते आम्ही तिकीट काढून विमानात बसलो. विमान सुरू होण्यापूर्वी एक ज्येष्ठ व्यक्ती विमानात येऊन पहिल्या चेअरवर बसली. मी माझ्या मित्राला विचारले की, ही व्यक्ती माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम तर नाही ना? एअर होस्टेसला विचारल्यानंतर तिने सांगितले, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आपल्याबरोबर अाहेत. आम्ही दोघे मित्र लगेच त्यांच्याकडे गेलो त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले... प्रसिद्ध छायाचित्रकार किशाेर अहिरराव यांना ‘दिव्य मराठी’ला ही अविस्मरणीय अाठवण सांगताना गहिवरून आले होते.
डॉ. कलाम यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्या भेटीबद्दल अहिरराव यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यातील तो अविस्मरणीय क्षण होता. दिल्लीला जात असताना जर आम्ही बिझिनेस टूरची संधी घेतली नसती तर एवढ्या मोठ्या व्यक्तीची भेट होणे दुर्लभच होते.
डॉ. कलाम यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना नाशिक शहराबाबत थोडी माहिती सांगितली. विमान सुरू होण्याची वेळ झाल्याने मग अाम्ही आमचे कार्ड त्यांना दिले. त्यांची ही दुर्मिळ भेट कायम स्मरणात राहावी म्हणून आम्ही त्यांच्याकडून अामच्या डायरीवर सही घेतली. आजही ती सही जपून ठेवली आहे. या भेटीनंतर दिल्ली येथील आमचे तिन्ही दिवस आनंदात गेले. दिल्लीवरून पुन्हा नाशिकला आल्यावर आम्ही सर्वांना हा आनंददायी अनुभव सांगितला.
सोमवारी (दि. २७) रात्री अचानक त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर त्यांच्याविषयीची ही विमानप्रवासातील झालेल्या भेटीची आठवण पुन्हा एकदा जागृत झाली. या भेटीचा प्रसंग जशाच्या तसा डाेळ्यापुढून सरकला. तो कधीच विसरला जाणारा अनुभव त्यांनी अनेक मित्रांनाही सांगितला. विमानप्रवासात झालेल्या भेटीची प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर अहिरराव यांनी जागवली आठवण

अचानक झालेली अविस्मरणीय भेट
माजीराष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी अचानक भेटीचा योग आल्याने हा क्षण माझ्या आयुष्यात कायम अविस्मरणीय राहील. त्यांच्या जाण्याने देशाची कधी भरून येणारी हानी झाली असून, माझ्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. किशोरअहिरराव, छायाचित्रकार