आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी माध्यमात परीक्षा देऊन डॉ. बोंदर झाले ‘अायएएस’, हिंदी भाषेत दिली मुलाखत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उस्मानाबाद जिल्ह्यातील डाॅ. सिद्धेश्वर बळीराम बाेंदर यांनी मराठी माध्यमात अायएएसची परीक्षा अाणि हिंदी भाषेत मुख्य मुलाखत देत जिल्हाधिकारी हाेण्याचे स्वप्न पूर्ण केले. इतकेच नाही तर ते भारतात १२२ व्या, तर राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजीच्या भीतीने अनेक विद्यार्थी उच्च ध्येय ठेवण्याचे स्वप्नच बघत नसताना प्रादेशिक भाषेत परीक्षा देऊन कलेक्टर हाेण्याची स्वप्नपूर्ती बाेंदर यांनी करून दाखवली ती केवळ जिद्दीच्या बळावरच. या परीक्षेसाठी नियमितपणे ‘दिव्य मराठी’चे वाचन केल्याचे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले.
केवळ इंग्रजीवर प्रभुत्व नसल्याने राज्यातील अनेकांचे अायएएस अधिकारी हाेण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. मात्र डाॅ. बाेंदर यांनी या त्याला छेद दिला अाहे. उस्मानाबादच्या वडगाव येथील मूळ रहिवासी असलेला सिद्धेश्वर हा शेतकरी कुटुंबातील. बालपणी त्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बीडमधील नांदूरघाटच्या जीवन प्रगती विद्यालयात घेतले. अकरावी अाणि बारावीचे शिक्षण अहमदपूरमधील महात्मा गांधी विद्यालयात घेतले. बारावीनंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बीएएमएस पूर्ण केले. त्यानंतर पुण्यात प्रॅक्टिस सुरू केली. परंतु जिल्हाधिकारी हाेण्याचे स्वप्न बाळगून अभ्यासही सुरू ठेवला. त्यासाठी मामा एम. एस. मुरकुटे व सनदी अधिकारी डाॅ. प्रवीण गेडाम यांचा अादर्श त्यांच्यासमाेर हाेता.

‘दिव्य मराठी’ने वाढवले सामान्यज्ञान
‘दिव्य मराठी’ वर्तमानपत्रातून सामान्य ज्ञानात चांगलीच भर पडत असल्याचे डाॅ. बाेंदरे यांनी नमूद केले. यूपीएससीचा अभ्यास करताना ‘दिव्य मराठी’चे वाचन मी कटाक्षाने केल्याचे ते म्हणाले. या शिवाय काही इंग्रजी वर्तमानपत्रही मी नियमितपणे वाचत हाेताे, असे ते म्हणाले.

इंग्रजी अाणि स्थानिक भाषांचे प्रशिक्षण
यूपीएससी परीक्षा मराठीत दिली तरीही ती उत्तीर्ण झाल्यानंतर इंग्रजीचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच ज्या ठिकाणी नियुक्ती केली जाते तेथील स्थानिक भाषेचेही विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी स्वतंत्र शिक्षकाचीही नियुक्ती केली जाते. त्यामुळे अन्य भाषांविषयी न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही, असे बाेंदर यांनी सांगितले.

डाॅ. बाेंदर यांच्या टिप्स
विषय समजून घेण्यावर भर द्या, गेल्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका साेडवा, विचार क्षमता विकसित करा, लिखाण शैली सुधारा, व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न करावा.
विचार हिंदीत केले
मी मराठीतून यूपीएससीची परीक्षा दिली. परंतु त्याचा अर्थ मी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्नच केला नाही, असा हाेत नाही. इंग्रजी वर्तमानपत्र अाणि पुस्तके मी सातत्याने वाचत हाेताे. अापल्याला अवगत नसलेली भाषा शिकायची असेल तर त्या भाषेत मनात विचार करणे गरजेचे अाहे. मी बराच काळ हिंदी भाषेतच विचार करीत हाेताे. त्यामुळे मुलाखतीला मला भाषेचा अडसर अाला नाही. - डाॅ. सिद्धेेश्वर बाेंदर
बातम्या आणखी आहेत...