आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Prabha Atre Get Jeewan Gowrav Awards In Nashik

डॉ. प्रभा अत्रे यांना जीवनगौरव पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना राज्य सरकारचा संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार रविवारी नाशकात संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे या पुस्काराचे स्वरूप आहे.
या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, आमदार जयंत जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, पुरस्कार निवड समिती सदस्य पं. प्रभाकर कारेकर, सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर, संजय भोकरे यांची उपस्थिती होती.
या वेळी अत्रे म्हणाल्या, शास्त्रीय संगीताला एका वेळ्या उंचीवर नेण्यात अनेक दिग्गजांची नावे आहेत. तसेच शास्त्रीय संगीताला, संगीतकारांना प्रतिष्ठा देऊन संगीत शिक्षण सुलभ करण्यता पंडित विष्णू नारायण भातखंडे, पं. विष्णू दिगंबर पलूस्कर आणि पं. हिराबाई बडोदेकर यांचे योगदनही मोठे आहे. शासनातर्फे अनेक पुरस्कार दिले जातात.
मग या त्रयींच्या नावे काही पुरस्कार सुरू करता येतील का ते पाहावे किंवा आहे त्या पुरस्कारांना, समारंभाला वा उपक्रमाला यांची नावे देता येतील का याचा जरूर विचार व्हावा. यामुळे या गुरुजनांच्या कार्याचा गौरवच होईल आणि आपल्याही ते कायम स्मरणात राहतील अशी मी माझ्या सर्व रसिकांच्या वतीने सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना सूचना करते तसे पत्रच मी लिहून आणले आहे. ते त्यांना देत आणि सूचनेचा स्विकार करावा, आदर करावा अशी विनंती मी त्यांना या निमित्ताने करते, असे प्रभाताईंनी या वेळी सांगितले.
अपेक्षा असणारा कलाकार नसतोच
ज्या कलाकाराला काही अपेक्षा असते मुळात तो कलाकार नसतोच. मी कलाकार आहे असे सांगणाराही कलाकार नसतो. कलाकाराला आपली ओळख वेगळी सांगण्याची गरज नसते ती त्याने त्याच्या कलेतून दाखवून द्यायची असते. त्याच्या मनातून तो कलाकार असेल तर असा विचारच त्याला शिवणारच नाही. त्यामुळे मलातरी शासनाकडून काहीच अपेक्षा नसल्याचे संगीत मार्तंड पंडित जसराज यांनी शासनाकडून तुम्हाला काही अपेक्षा आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पंडितजी सोहळ्यासाठी येथे आले होते.