आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगतीसाठी अणुऊर्जा आवश्यक - डॉ. शंकरराव गोवारीकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आण्विक ऊर्जेचा वापर सकारात्मक रीतीने करण्याचा मान भारतालाच जातो. अणुऊर्जा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर विरोध होत असला तरीही असे प्रकल्प देशाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी केले.
एचपीटी आर्ट्स व आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि गुणगौरव समारंभप्रसंगी ते बोलत होते. गोवारीकर यांनी विद्यार्थ्यांना अणुऊर्जा निर्मिती प्रकल्पांची पार्श्वभूमी सांगितली. अणुऊर्जा निर्मितीसाठी डॉ. होमी भाभा यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देत त्यांनी अणुऊर्जा ही आजच्या घडीला देशासाठी किती महत्त्वपूर्ण आहे, याविषयी आपली भूमिका मांडली.
जैतापूरसारख्या प्रकल्पांना होत असलेल्या विरोधाविषयी बोलताना त्यांनी ‘असे अणुप्रकल्प व्हायलाच पाहिजेत’, असे ठाम मत मांडले. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी अध्यक्षस्थानी होते. सन्माननीय पाहुणे म्हणून सोसायटीचे विभागीय सचिव प्रा. बी. देवराज उपस्थित होते.
प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. एस. आर. खंडेलवाल, विद्यार्थी सभा अध्यक्ष प्रा. आर. टी. आहेर आदी उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी दीपक वडजे याने अहवाल वाचन केले. प्रा. रूपन सिंग यांनी आभार मानले. डॉ. गोसावी यांनी याप्रसंगी महाविद्यालयाच्या उज्ज्वल यशाचा संदर्भ देत महाविद्यालयाचा दर्जा
केंब्रिज विद्यापीठाइतका करू, असा विश्वास या वेळी व्यक्त केला.