आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी भाषेची श्वेतपत्रिका यंदाच्या संमेलनात काढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - डाेंबिवली येथे हाेणारे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलन ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान हाेणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद जाेशी यांनी दिली. या तीन दिवसीय संमेलनात प्रामुख्याने ‘मराठी भाषेची सद्य:स्थिती आणि उपाययोजना’ यावर श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे.

अध्यक्षीय भाषणावर चर्चा : संमेलनातील कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण किमान ४० मिनिटांचे असावे, असा प्रयत्न आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी याच भाषणावर स्वतंत्रपणे चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

परिसंवाद : बदलती अर्थव्यवस्था, समाजाचे विघटन आणि मराठी लेखन, ग्रामीण स्त्री, वास्तवातील आणि साहित्यातील, पुरोगामी महाराष्ट्र, वाढती असहिष्णुता, साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व, आम्हीच मराठीचे मारेकारी !, मराठी समिक्षेची समीक्षा, विविध साहित्य प्रवाहांची सद्य:स्थिती (उदा. दलित, कामगार, वगैरे)

प्रकाशन मंच : संमेलनस्थळी तीन दिवस एका प्रकाशन मंचाची व्यवस्था करण्यात येणार असून या ठिकाणी प्रकाशक आपल्या नवीन साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करू शकतील.
कविसंमेलन : ६० निमंत्रक कवींची २ कविसंमेलने आणि कवी कट्टा.
बालकुमार संमेलन : बालकुमार भाषा साहित्य मेळाव्याचे अायाेजन.

साहित्यिकांशी गप्पा : तीन प्रतिभावंत साहित्यिकांशी दिलखुलास गप्पाचा ‘प्रतिभायन आणि ३ मान्यवर कवींचा सहभाग असलेला कवी, कविता आणि काव्यानुभव असे महत्त्वाचे दाेन कार्यक्रम. दाेन प्रकट मुलाखती. तसेच झाडी, अहिराणी, मराठवाडी, कोंकणी, मालवणी, आगरी आणि मिश्रभाषी अशा बोलीभाषेतील कथाकथन.

रसिकांसाठी शुुल्क
ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन त्रिसदस्यीय समितीने केले अाहे. या प्रदर्शनातील स्टॉलसाठी साडेसहा हजार रुपये तर संमेलनासाठी येणाऱ्या प्रतिनिधींसाठी ३ दिवसांचे निवास आणि भोजन शुल्क ३ हजार रुपये, निवासाव्यतिरिक्त भोजन शुल्क १५००, एक वेळचे भोजन शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...