आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्य संमेलन ‘टुरिझम’च, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद जाेशी यांचा ‘घरचा आहेर’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘गणेशाेत्सव, दहीहंडी, नवरात्राेत्सवाचे स्वरूप बदलले का अाहे? तर अायाेजकांना उद्या लाेकप्रतिनिधी व्हायचे अाहे. साहित्य संमेलनाचेही तसेच झाले अाहे. हल्ली तर अायाेजकांकडून बाेलीच लागते. स्वत:ला वारकरी म्हणून घेण्याची अाम्हा साहित्यिकांची लायकी अाहे का? पूर्वी संमेलनात तात्त्विक-वैचारिक वाद व्हायचे अाजचे वाद बिनबुडाचे असतात... संमेलनात माणसांची एकमेकांशी भेट हाेते, साहित्यचर्चा हाेते हे साफ खाेटे अाहे. इथे फक्त हितसंबंध जपले जातात, स्पर्धा लागते, साहित्यिक पाकीट घेतात अाणि दुसऱ्या दाराने बाहेर पडतात अशी परिस्थिती पाहून साहित्य संमेलन जणू एक टुरिझमच झाले अाहे,’ असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद जाेशी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केले.

जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद‌्घाटन कारयक्रमात ते बाेलत हाेते. संमेलनाच्या अायाेजनासह एकूणच प्रक्रियेवर ताशेरे अाेढताना डाॅ. जाेशी म्हणाले, ‘संमेलनाला जास्त गर्दी म्हणजे संमेलन यशस्वी असे म्हटले जाते, पण संमेलनाला गर्दीची नाही तर दर्दींची गरज असते. अाज संमेलनांची संस्कृती ही गर्दीच्या उत्सवाची संस्कृती झाली अाहे. संमेलने फक्त गर्दीची न राहावी, अन्यथा ती राष्ट्राचे शत्रू समजले जातील. हा वाङ‌्मयीन संस्कृतीचा विकास अाहे की दिशा यावर गांभीर्याने विचार हाेणार अाहे की नाही? माझ्या मते हा विचार संमेलनांमध्ये नाही तर लहान मेळाव्यांमध्ये हाेताे. पण घडते उलटे. अाजकाल संमेलनात वक्ते भाषणाची तयारीदेखील करून येत नाहीत... पाकीट घेतात अाणि चालायला लागतात. तरीही यांना साहित्याचे वारकरी म्हणायचे.?’ असा प्रश्नही त्यांनी विचारला.

अामची (साहित्यिकांची) लायकी अाहे का वारकऱ्यांशी तुलना करण्याची. वारकरी काही विठाेबाकडे मानधनाचं पाकीट मागत नाही. पण अाम्हाला हवे असते. असे प्रश्न साहित्यिकांना काेणी विचारायचे? काेणीच विचारत नाही. कारण संमेलने धनसत्तेच्या अाणि राजसत्तेच्या दावणीला बांधली जात अाहेत. अहाे, चार डाेकी एकत्र अाली की वाद हाेणारच. संमेलनातही पूर्वी वाद हाेतच हाेते, पण ते तात्त्विक, वैचारिक भूमिकांचे हाेते. अाता काय हाेते ते अापण बघताेच अाहाेत. संमेलनं पूर्वीही कमी पैशात हाेत हाेती. पण अाता एेश्वर्य दाखवलं जातं. मी अध्यक्ष झाल्यावर प्रस्ताव दिला की, संमेलन दाेन वर्षांतून एकदा घ्यावे. तर इतर पदाधिकारी नाही म्हणाले. अाम्ही संमेलन अायाेजकांना सूचना दिल्या. त्यांनी पाळण्याचे वचन दिले. अाता त्या पाळायच्या की नाही हा नैतिक मुद्दा अाहे, असेही त्यांनी व्यक्त करतानाच संमेलनातून मिळणाऱ्या पैशावर भाष्य केले.

एवढी वर्षे संमेलनात ग्रंथप्रदर्शन भरते. काेटीच्या काेटी उड्डाणे या प्रदर्शनातून घेतलेली अापण बघताे. कधीच एकाही प्रकाशकाला वाटले नाही अापण साहित्य महामंडळाला काही द्यावे. वाटणारच नाही. कारण भाषा, साहित्य, संस्कृती अापली वाटली पाहिजे ना! सगळे काही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी करायचे. ते काय ठेकेदार अाहेत? अापली काही जबाबदारी अाहे की नाही? पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. वेगवेगळ्या कारणांसाठी काेणाला अायाेजक व्हायचं अाहे तर काेणाला स्वागताध्यक्ष. अापण का प्रश्न विचारत नाही? महाराष्ट्राचं मंडळीकरण नव्हे, संस्थापीकरण झाल्याची टीकाही त्यांनी केली.

‘वेगवेगळे गट झाल्याने शासनावर दबाव येत नाही’
एकूणच अविवेकी, अनैतिकता यापासून अापल्याला वाचायचे असेल तर साहित्य-संस्कृती हेच जवळचे क्षेत्र अाहे. पण अापला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकाेनच गंभीर नाही. भाषिक वर्तन, सांस्कृतिक वर्तनाचा अभ्यास गरजेचा अाहे. पण वेगवेगळे गट अस्तित्वाचे झेंडे मिरवतात. म्हणूनच शासनाच्या धाेरणांवर दबाव येत नसल्याची खंतही त्यांनी जाेशी यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...