आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गटारीसंध्या पोलिस ठाण्यात; मद्यप्राशन करून वाहन चालवणे 30 जणांना भोवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गटारी अमावास्या साजरी करणार्‍या तळीरामांवर करडी नजर ठेवत पोलिसांनी मंगळवारी शहरात 40 ठिकाणी नाकेबंदी करीत मद्य पिऊन वाहने चालवणार्‍या 30 जणांना अटक केली. या मंडळींना रात्र पोलिस ठाण्यांमध्येच काढावी लागली. त्याचबरोबर, मिशन ऑलआउट मोहिमेअंतर्गत 450हून अधिक टवाळखोर, गुंडांना ताब्यात घेण्यात आले.

450 टवाळखोरांविरुद्ध कारवाई : शहर व परिसरात रात्रीच्या सुमारास चौक, रहिवासी भागात गोंधळ घालणार्‍या आणि टवाळखोरी करणार्‍या जवळपास 450 जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

ड्रंक अँण्ड ड्राइव्ह मोहीम
वाहतूक पोलिसांसह पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेत सकाळी 9 ते रात्री 10 वाजेदरम्यान 1100 वाहने तपासली. 121 वाहनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करीत 12 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक कारवाई गंगापूररोड भागात जेहान सर्कल, महात्मानगर भागात करण्यात आली.