आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी गटार : सीबीअाय चाैकशीचा महापाैरांचा पवित्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वादग्रस्त पावसाळी गटार याेजनेची राज्य शासनामार्फत सीबीअाय (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) चाैकशी करण्याचा पवित्रा महापाैर रंजना भानसी यांनी घेतला अाहे. तशा मागणीचे पत्र राज्य शासनाला दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर गरज वाटल्यास शासन याेग्य त्या उच्च प्राधिकरणाकडे प्रकरण साेपवेल, असेही त्यांनी नमूद केले. 
अनेक वर्षांपासून गाजत असलेल्या पावसाळी गटार याेजनेमुळे यंदा नाशिककरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत अाहे. याेजनेत माेठा भ्रष्टाचार झाल्याचे अाराेप यापूर्वीच झाले. त्यासाठी चाैकशी समिती स्थापन करून एका अधिकाऱ्याला निलंबितही करण्यात अाले; मात्र त्यानंतर त्याला पुन्हा सेवेत घेण्यात अाले. परंतु, या प्रकरणाची चाैकशी काही पूर्ण झाली नाही. दुसरीकडे, यंदा पावसाळापूर्व सफाईही व्यवस्थित झाली नसल्याचे अाराेप नगरसेवकांनी महासभेत केले हाेते. प्रभागनिहाय ३१ ठेकेदार सफाईसाठी नेमल्याचा शहर अभियंता यू. बी. पवार यांचा दावा हाेता. प्रत्यक्षात, हे ठेकेदार काेणालाच दिसले नसल्याचा अाराेप नगरसेवकांनी केला हाेता. त्यामुळे पावसाळी गटारीचा विषय चिघळला. १४ जूननंतर, १४ जुलै राेजी म्हणजे बराेबर एका महिन्याने पुन्हा पावसाळी गटार याेजनेच्या दुर्दशेचा फटका बसल्यामुळे महापाैरांनी अखेर ‘दूध का दूध’ करण्याचा पवित्रा घेतला अाहे. त्यानुसार त्यांनी राज्य शासनाला पत्र पाठवून या प्रकरणाची सीबीअाय वा तत्सम उच्च प्राधिकरणामार्फत चाैकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे जाहीर केले. 

अाता उघडणार बुजलेली चेंबर्स 
महिनाभरात तब्बल दाेनदा पावसाचे पाणी साचून नुकसान झाल्यानंतर अाता काेठे महापालिकेला जाग अाली असून, रस्ते डांबरीकरणात बुजलेली पावसाळी गटारींची चेंबर खुली केली जाणार अाहेत. जेथे पाणी तुंबते, तेथेही नवीन चेंबर्स बांधली जाणार असून १६९ ठिकाणी विविध प्रकारची कामे करण्यात आली आहेत. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचाच बांधकाम विभाग राबत असल्याचे चित्र १४ जुलै राेजीही दिसले हाेते; मात्र ते खाेडून काढत प्रभागनिहाय ठेकेदारांमार्फत पाण्याचा निचरा केल्याचा दावा शहर अभियंता पवार यांनी केला. १४ जेसीबी १५ ट्रॅक्टरच्या मदतीने नाशिक पूर्व विभागात ३८, नाशिक पश्चिममध्ये २७, पंचवटीत १७, नाशिकरोडला २१, नवीन नाशिकमध्ये ४६ तर सातपूर विभागातील २० कामे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सराफ बाजारातील स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पावसाळा संपल्यावर उखडलेल्या रस्त्यांचे नूतनीकरण ठेकेदारामार्फत केले जाणार असून त्याची जबाबदारीही ठेकेदाराचीच असेल, असेही पवार त्यांनी सांगितले. 

अाता शासनच निर्णय घेईल 
^पावसाळी गटार याेजनेतील भ्रष्टाचाराबाबत वारंवार अाराेप-प्रत्याराेप हाेत असून या पार्श्वभूमीवर सीबीअायमार्फत चाैकशी करण्यासाठी राज्य शासनाला पत्र पाठवले जाईल. त्यानंतर शासन निर्णय घेईल. -रंजना भानसी, महापाैर 
 
बातम्या आणखी आहेत...