आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नंदिनी नदीमध्ये साेडण्यात येणारे शहरातील नाल्यांचे पाणी करणार बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदिनी नदीची पालिका उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी पाहणी केली. नदीत नाल्याचे पाणी सोडले जाणाऱ्या ठिकाणाबाबत माहिती घेतली. - Divya Marathi
नंदिनी नदीची पालिका उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी पाहणी केली. नदीत नाल्याचे पाणी सोडले जाणाऱ्या ठिकाणाबाबत माहिती घेतली.

सिडको- नंदिनी नदीत नाल्याचे पाणी सोडले जात असल्याने या नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे धक्कादायक वास्तव दिव्य मराठीने ‘डी. बी. स्टार’च्या माध्यमातून समोर आणले आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध हाेताच त्याची तत्काळ दखल घेत महापालिकेच्या उपायुक्तांनी गोदा संवर्धन मोहिमेच्या सदस्यांना सोबत घेऊन पाहणी दौरा केला. ज्या ज्या ठिकाणी नदीत नाल्यांचे पाणी सोडले जात आहे, त्या ठिकाणी पाहणी करत माहिती घेतली. याबाबत लवकरच सर्व्हे करून हा प्रकार थांबविला जाण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 


त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी पर्वताजवळ सुपाता डोंगररांगांतून स्वच्छ, नितळ पाण्याने खळखळून वाहणारी नंदिनी नदी सातपूरपासून नाशिक शहरात वाहताना नासर्डी नावाने ओळखली जाते. नदीत नाल्याचे पाणी वाहत असल्याने या नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोणत्याही नदीत नाल्याचे पाणी सोडण्यास पूर्णतः बंदी आहे. याबाबत न्यायालयाचेही आदेश असताना सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहे. पालिका प्रशासनाकडूनच कायद्याला केराची टोपली दाखविली जात आहे. नाल्याच्या पाण्यावर मलजलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पालिकेच्या ड्रेनेज विभागाकडे ही जबाबदारी असताना या विभागाचे अधिकारी गप्प अाहेत. याबाबत उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी नंदिनी नदीचा पाहणी दौरा केला. नाल्याचे पाणी नदीत एकत्रित होत असलेल्या ठिकाणाची पाहणी केली. 

 

उंटवाडी, सातपूर, नंदिनी नदीचा उगम या ठिकाणी पाहणी केली. या सर्व प्रकाराबाबत सर्व्हे करून त्यावर उपाययोजना केल्या जातील तसेच नदीत नाल्याचे पाणी सोडण्याचा प्रकारही थांबविला जाईल. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...