आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी हद्दीतील नाल्यांच्या सफाईकडे काणाडाेळा, कालावधी उलटूनही नालेसफाईसाठी वर्कअाॅर्डरची अद्यापही प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील विविध परिसरात तुंबलेले नाले, गटारी, ढासळलेल्या रिटेन्शन वाॅल, फुटलेले वा चाेरीस गेलेले ढापे, पालिकेकडून दुर्लक्षित केली जाणारी कामे याबाबत अनेक जागरूक नागरिकांनी ‘डी.बी. स्टार’कडे तक्रारी केल्या अाहेत. विशेष म्हणजे, पावसाळापूर्व कामे पूर्णत्वास येण्याचा कालावधी उलटूनदेखील या कामांना प्रत्यक्षात सुरुवातदेखील झालेली नसून, अधिकारी मात्र अजून दहा ते बारा दिवसांत ‘वर्क अाॅर्डर’ येण्याची अाश्वासने देत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला अाहे. अनेक नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत महापालिकेकडे अाॅनलाइन वा प्रत्यक्ष तक्रारी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका संबंधित विभागाने घेतल्याचे दिसून येते. नाशिकराेड भागातील जय भवानीराेड परिसरातदेखील अनेक नागरिकांनी पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर व्हावीत, जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांच्या अाराेग्याचा प्रश्न उपस्थित हाेणार नाही, अशी मागणी केली अाहे. मात्र, तब्बल महिनाभराहून अधिक कालावधी उलटूनदेखील त्याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते.
नाशिकराेड परिसरातील समस्येकडे यावर्षीही दुर्लक्षच
प्रत्येक पावसाळ्यात नाशिकराेड परिसरातील मुख्य रस्त्यांवर अाणि सहाणे मळा, लवटे मळा, भालेराव मळा, अाैटेनगर, अाडकेनगर, स्वामी विवेकानंदनगर, दुर्गानगर, जय भवानी चाैक अादी परिसरात पाणी तुंबण्याची समस्या उद‌्भवते. काही काॅलन्यांमध्ये तर घरात पाणी घुसते. तसेच जय भवानी रस्त्यालगतच्या दुकानांमध्येही पाणी शिरते. परिणामी, व्यापाऱ्यांचे माेठे नुकसानही हाेते. मात्र, अशी समस्या असताना स्थानिक लाेकप्रतिनिधी मात्र तक्रारी येऊनही त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याची अाेरड अाहे. महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांकडेही या समस्येबाबत तक्रारी केल्या असता त्यांच्याकडून ‘अाॅर्डर’ येण्याची वाट बघताेय, हेच उत्तर एेकावयास मिळते.

अंबड,सातपूर परिसरातील कंपन्यांत यंदाही तुंबणार पाणी...?
सातपूर परिसरातील सीएट, तसेच महिंद्रा कंपनीलगतच्या नाल्यांची अद्यापदेखील सफाई करण्यात अाली नसल्याने पाणी साचण्याची समस्या यावर्षीही उद‌्भवेल, अशी भीती व्यक्त केली जात अाहे. अंबड एमअायडीसी परिसरातील काही नाले दरवर्षी तुंबतात त्यामुळे पाणी साचण्याची समस्या उद‌््भवते. उद्याेजकांना याचा माेठा फटका बसताे. मात्र, अशा परिस्थितीतही या ठिकाणी स्वच्छता माेहीम राबविण्यात दिरंगाईच केली जाते. कामगारनगर अन्य काही परिसरातील नाल्यांची अद्यापही सफाई झाली नसल्याने या ठिकाणीदेखील अाराेग्याच्या समस्या डाेके वर काढण्याची दाट शक्यता वर्तविली जात अाहे. विशेष म्हणजे, याबाबत वारंवार पाठपुरावा करणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या उदासीन कारभाराचेच दर्शन घडले अाहे.

टेंडर काढण्याचीच घाई का?
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नदी, नाले, गटारी यांची स्वच्छता करण्यासाठी तसेच, नाल्यांमध्ये अडकलेले प्लास्टिक, कचरा, वाढलेले गाजरगवत, तुंबलेले ड्रेनेज काढणे ही कामे प्राधान्याने करण्यासाठी पालिकेकडून लाखाे रुपयांची टेंडर्स काढली जातात. गमतीचा भाग म्हणजे ठेकेदारांकडून कामे हाेण्यापूर्वीच पाऊस हजेरी लावताे अाणि पावसामुळे बराचसा परिसर अापाेअापच स्वच्छ हाेताे. मग दरवेळेस केवळ ठेकेदारांना पाेसण्यासाठी हे टेंडर काढले जाते का? असा प्रश्नही काही नगरसेवकांनी उपस्थित केला अाहे.

ही कामे हाेणे अपेक्षित...
पावसाच्यापाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिकेच्या संबंधित विभागाने नाले, पावसाच्या पाण्याच्या वाहिन्या, गटारी साफ करणे गरजेचे अाहे. नाले, गटारी आणि पावसाच्या पाण्याच्या वाहिन्यांचा सातत्याने अाढावा घेऊन अापत्कालीन परिस्थिती उद‌्भवू नये यासाठी याेग्य उपाययाेजना करणे अपेक्षित अाहेे. तसेच, महावितरण कंपनीकडून धाेकादायक तारा, विद्युत पाेल, डीपी यांची दुरुस्ती हाेेणे अत्यंत गरजेचे असते. जेणेकरून पावसाळ्यात अापत्ती अाेढवणार नाही.

नागरिकांच्या सूचनांनाही केराची टाेपली
पावसाळा ताेंडावर येऊनदेखील पालिका प्रशासन निद्रितावस्थेत असताना अनेक जागरूक नागरिकांंनी ही कामे लवकरात लवकर याेग्य पद्धतीने व्हावीत, याबाबत सूचना केल्या. मात्र, पालिका अधिकारी, लाेकप्रतिनिधींकडून या सूचनांनाही केराची टाेपली दाखविण्यात अाल्याने नाराजीचा सूर व्यक्त हाेत अाहे. जय भवानी राेड परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा सविस्तर लेखाजाेखा पालिका प्रशासनाकडे मांडल्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई हाेत नसल्याचे सांगण्यात अाले.

प्रशासनाने स्वच्छता माेहीम राबवावी
^जयभवानीरोड परिसरातील नाले गाळ कचऱ्याने भरलेले आहेत. भूमिगत मार्गावर बसविण्यात आलेली झाकणे तुटलेली असून रस्त्याच्या बाजूला बेकायदा पार्किंग, कचरा आणि डेब्रिज टाकण्यात आले आहे. दिवसेंदिवस साचणाऱ्या कचऱ्याने रोगराई वाढत आहे. प्रशासनाने स्वच्छता माेहीम राबवायला हवी. - शेखर संपतराव लवटे

बाराही महिने नाले साफ असावेत
^पावसापूर्वी नालेसफाई होणे गरजेचे आहे. प्रशासनाने माेहीम हाती घ्यायला हवी. तसेच नागरिकांनीही प्लास्टिक वा अन्य कचरा नाल्यांमध्ये टाकता नाले बाराही महिने साफ राहतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे अाहे. नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनावर विसंबून राहता स्वत:च जबाजदारीने पुढाकार घेेणे अावश्यक अाहे. - राहुल विलास औटे, स्थानिक नागरिक

नीलेश साळी, उपअभियंता,बांधकाम विभाग, नाशिक महापालिका
जय भवानी राेड परिसर हा अर्टिलरी सेंटर या लष्करी हद्दीलगत अाहे. लष्कराच्या या भागातून दाेन माेठे नाले जय भवानी राेडकडे वाहतात. या दाेन्ही नाल्यांदरम्यान अनेक काॅलनी, नगरे तसेच वसाहती अाहेत. या नाल्यांमध्ये माेठ्या प्रमाणात कचरा साचल्याने तसेच, झाडी-झुडपे वाढल्याने पावसाळ्यात पाणी साचून ते थेट रस्त्यांवर अथवा नजीकच्या घरांमध्ये शिरण्याची दाट शक्यता असते. यामुळे दरवर्षी अाराेग्याच्या समस्या उद‌्भवत असल्याने प्रशासन मात्र माेहीम राबविण्यात असमर्थताच दर्शवत असल्याचे दिसते.

प्रस्ताव दिलेले अाहेत..
^नाले सफाईसाठी पूर्वी प्रभागाला दाेन लाख रुपये मंजूर केले जात हाेते. परंतु, अाता मात्र ती पद्धत बंद करण्यात अाली अाहे. अाम्ही या कामाचे प्रस्ताव दिलेले अाहेत. अाता बघूया केव्हा ही कामे हाेतात. वेळेत कामे झाल्यास अाराेग्याची गंभीर समस्या उद‌््भवू शकते, यात शंका नाही. - शिवाजी सहाणे, नगरसेवक
थेट प्रश्न
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचे संकेत अाहेत. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, दाेन ते चार दिवसांत मान्सून शहरात सक्रिय हाेण्याची दाट शक्यता अाहे. असे असताना प्रत्यक्षात मात्र जून महिन्यातही महापालिकेतर्फे पावसाळापूर्व नालेसफाई अन्य महत्त्वाच्या कामांना प्रारंभ करण्यात अालेला नसल्याची बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाली अाहे. अशा परिस्थितीत पाऊस पडल्यास नाले, ड्रेनेज तुंबून गंभीर समस्या डाेके वर काढेल, यात शंका नाही. अाराेग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरणाऱ्या या समस्येकडे पालिकेकडून मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही साेयीस्करपणे दुर्लक्षच केले जात अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझाेत...
{ जूनमहिना सुरू हाेऊनदेखील पावसाळापूर्व कामे सुरू का झाली नाहीत? ती केव्हा सुरू हाेणार?
-हाेय, अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. परंतु, येत्या दहा ते पंधरा दिवसांत वर्क अाॅर्डर निघेल अाणि लागलीच कामे सुरू हाेतील.
{ परिसरातअशी काेणती ठिकाणे अाहेत की जेथे दरवर्षी पाणी तुंबते? त्यासाठी काय ठाेस
उपाय याेजना करणार?
-नवले चाळ, सिन्नर फाटा, साैभाग्यनगर, जय भवानीराेड या परिसरात दरवर्षी पाणी साचते. सिंहस्थाच्या वेळी सिन्नर फाटा, सुभाषराेड नवले चाळ येथे काँक्रिटीकरण करून बाॅक्स नाले केल्यामुळे कायमचा प्रश्न सुटला अाहे. तशीच उपाययाेजना करण्याची गरज वाटते.
{ कामांनासुरुवात हाेण्यापूर्वी जर मुसळधार पाऊस झाला अन् पाणी तुंबले तर काय करणार?
-मनपाची यंत्रणा त्यासाठी तयार अाहे. तातडीने उपाययाेजना केल्या जातील.
बातम्या आणखी आहेत...