आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालिदाससह पंडित पलुस्कर सभागृहाचाही झाला सर्व्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील नाट्यगृहांची अवस्था अतिशय भयानक झाली आहे. बाहेरून इमारती सुंदर दिसतात, आत मात्र सुविधांची वानवा आहे. या नाट्यगृहांबद्दल माध्यमांसह रंगकर्मींनी वेळाेवेळी आवाज उठवला आहे. त्यामुळेच शासनाने याची दखल घेत राज्यातील सर्वच नाट्यगृहांची अवस्था आणि सुधारणा जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्व्हेत नाशिकच्या सर्वच नाट्यगृहांचा असा सर्व्हे देण्यात आला आहे.

शहरातील महत्त्वाचे नाट्यगृह म्हणजे महाकवी कालिदास कलामंिदर. यातील दुरवस्था आता सर्वश्रुत आहेे. मॅटमध्ये पाय अडकून प्रेक्षक पडणे, खुर्च्यांमध्ये कपडे अडकून फाटणे, लेव्हलमध्ये पाय अडकून चालू प्रयाेगात कलाकाराचा अपघात हाेणे या आणि अशा अगणित असुविधांनीच महाकवी कालिदास कलामंिदर भरलेले आहे. फक्त कालिदासच नव्हे, तर दादासाहेब गायकवाड सभागृहातही तुटलेल्या खुर्च्या, लागणारे पडदे, साउंडचा गाेंधळ अशा अनेक समस्या आहेत. पंडित पलुस्कर सभागृहदेखील याच रांगेत येऊन बसते. महापालिकेच्या मालकीची ही नाट्यगृहे असतानाही आणि ती उत्तम उत्पन्न मिळवून देत असतानाही त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष हाेते आणि साधा देखभाल दुरुस्तीचा खर्चही केला जात नाही. त्यामुळे ही आेरड थेट शासनापर्यंत पाेहाेचल्याने आता शासनानेच या संदर्भातील एक सर्वे हाती घेऊन या नाट्यगृहांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यावरून एक अहवाल करण्यात येऊन धाेरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिकमधील कालिदास कलामंदिर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, पंडित विष्णू दिगंबर पलुुस्कर सभागृह आणि सार्वजनिक वाचनालयाचे प. सा. नाट्यगृह यांचे सर्वेक्षण झाले आहे. या सर्व्हेसाठी नाट्य निर्माता संघातर्फे नाशिकमध्ये प्रणित बाेडके, संयाेजक राजेश जाधव आणि शासनाने नेमलेल्या जे. जे. स्कूल आॅफ आर्टचे दाेन विद्यार्थी यांनी सर्वे पूर्ण केला आहे. यासाठी पाच विभागात ३६ प्रश्नांची प्रश्नावलीच तयार करण्यात आली हाेती. यात पहिल्या विभागात नाट्यगृहाची भाैगाेलिक माहिती, साेयी सुविधा, वाहनतळ दुसर्‍या विभागात वित्तविषयक माहिती पुढे कलाकारांचे अभिप्राय, प्रेक्षकांचे अभिप्राय आणि दुरुस्ती विषयबाबी अशी सर्व माहिती भरून द्यायची हाेती. ती संबंधितांनी भरून शासनाकडे दिलेली आहे. आता राज्यातील सर्वच नाट्यगृहांचे हे सर्वेक्षण अखेरच्या टप्प्यात असून, त्याचा अहवाल येत्या पंधरा दिवसांमध्ये तयार हाेणार आहे.

सर्वताेपरी मदत
संयाेजक म्हणून मी काम केले. शासनाला नाट्यगृहांची जी काही माहिती हवी आहे तिथंपर्यंत आपण पाेहाेचवण्याचं काम केलं आहे. या संदर्भात काही ज्येष्ठ व्यक्तींचा सहभाग आवश्यक हाेता पण त्यांना शासनाचे पत्र हवे हाेते. मला असं वाटतं की, काम हाेण्याशी मतलब ठेवून हेवेदावे बाजूला ठेवले, तर आपले काम लवकर हाेईल. राजेशजाधव, शासनाच्या कार्यक्रमांचे नाशिकमधील संयाेजक

हे ही नसे थाेडके
नाट्यगृहांच्या आता एक पाऊल उचलले आहे. कागदाेपत्री झाले प्रत्यक्षात हाेईल, तेव्हा हाेईल पण हे ही नसे थाेडके असे आपण म्हणूया. या संदर्भात शासनाकडून जेजेचे विद्यार्थी आणि नाट्य निर्माता संघातर्फे मी असे आम्ही काम केले आहे. सर्व प्रश्नावली भरून दिली आहे. जे नव्हते, पण आपल्या नाट्यगृहाची गरज म्हणून तेदेखील निदर्शनास आणून दिले असून, ताे सर्व्हे अहवाल पुढे दिला आहे. प्रणितबाेडके, प्रतिनिधी, व्यावसायिक नाट्य निर्माता संघ, मुंबई

वित्तविषयक माहिती देणे बाकी
या संदर्भात वित्तविषयक माहिती देणे बाकी आहे. त्यात कंत्राटदारांचे नाव, भाडे, गेल्या तीन वर्षांतील वित्तविषयक माहिती, प्रयाेगांची संख्या, इतर कार्यक्रमांची संख्या अशी जी काही आकडेवारी आहे ती अद्याप देणे बाकी आहे. ती त्वरित देण्याची तयारी सुरू आहे. जगन्नाथकहाणे, व्यवस्थापक, शहरातील सर्व नाट्यगृह

प. सा. चीही माहिती मागविली
महापालिकेच्या नाट्यगृहांबराेबरच सावानाच्या प. सा.चीही माहिती शासनाने घेतली आहे. आणखी काय गरजा आहेत या बद्दलही विचारणा केली हाेती त्यात प. सा.चे वातानुकूलित यंत्रणा, नवीन खुर्च्या, रंगमंचाच्या फळ्या बदलणे अशा सूचना नमूद केलेल्या आहेत. - सुरेशगायधनी, सचिव
बातम्या आणखी आहेत...