आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इम्पॅक्ट: नाशिकच्या त्रिमूर्ती चौकातील‘गटारगंगा’ बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरातून जाणार्‍या पावसाळी गटार लाइनचे चेंबर नादुरुस्त झाल्यामुळे गटारीतील दूषित पाणी रस्त्यावर येत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करताच त्याची महापालिकेने तातडीने दखल घेतली. सोमवारी सकाळी महापालिकेच्या सिडको विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी या ठिकाणी येऊन नादुरुस्त झालेल्या चेंबरची दुरुस्ती केली.

गेल्या अनेक दिवसांपासून त्रिमूर्ती चौकात दूषित पाणी रस्त्यावर साचत असल्याने या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाचे प्रमुख प्रकाश पठाडे व डी. एल. गवळी यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. पावसाळी गटारीत येथील सर्व्हिस स्टेशन व्यावसायिकाने कनेक्शन जोडून पाणी सोडले होते. चेंबरमध्ये कचरा व दगडाचे गोटे अडकल्याने दूषित पाणी रस्त्यावर साचत होते. सर्व्हिस स्टेशन व्यावसायिकाचे कनेक्शन बंद करून चेंबरमध्ये अडकलेला कचरा बाहेर काढून ते मोकळे केले. या वेळी नगरसेवक अनिल मटाले व परिसरातील नागरिक उपस्थित होते.