आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात मद्यधुंद जवानाची वाहनाला धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आर्टिलरी सेंटरच्या एका मद्यधुंद जवानाने पथदीप दुरुस्ती करणार्‍या एका वाहनास धडक दिल्याने दोन वायरमन गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड पोलिसांनी लष्कराच्या या जवानास अटक केली आहे. त्याला स्वत:चे नावही सांगता येत नव्हते, एवढे त्याने मद्य प्राशन केले होते. अखेरीस पोलिसांनी त्याचे ओळखपत्र तपासून कारवाई केली.

लेखानगर येथील सुंदरबन कॉलनीत पालिकेतर्फे लॅडरद्वारे पथदीप दुरुस्तीचे काम सुरू होते. या वेळी लेखानगरकडे भरधाव वेगाने जाणार्‍या मिलिटरीच्या ट्रकने या वाहनाला जोरदार धडक दिली. शिडीवर काम करणारे वायरमन शिवसिंग देवरे व व सुधीरकुमार हे यात गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर वाहन चालक जवानास नागरिकांनी चोप देत वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. आर्टिलरी सेंटरच्या या जवानाचे नाव रोहित रवींद्र सिंग असे आहे.

पोलिसांचे असेही देशप्रेम
अपघात केलेला मिलिटरीचा जवान गणवेशात असल्याने संरक्षण खात्याचे नाव बदनाम होईल. जवानाच्या गणवेशावर पोलिसांनी रेनकोट परिधान करून त्या जवानास वैद्यकीय तपासणीस घेऊन गेले.