आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळिराम वाहनचालकांकडून पोलिसांनाच आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ प्रकरणात एका सिनेअभिनेत्याला सुनावलेेल्या शिक्षेचे प्रकरण गाजत असतानाच गेल्या आठवड्यात एका महिला वकिलाने मद्य प्राशन करून भरधाव वेगाने गाडी चालवत दाेन निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्याची घटनाही घडली. याच पार्श्वभूमीवर शहरातील वर्दळीच्या ठिकाणांची ‘डी.बी. स्टार’ चमूने पाहणी केली असता, बिअरबारमधून तर्राट होऊन बाहेर पडणारे मद्यपी कोणाचीही भीती बागळता भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने मुंबई शहरातील घटनेची पुनरावृत्ती नाशकातही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

वर्षभरात फक्त थर्टी फर्स्ट, गटारी अमावास्या अशा काही ठराविक दिवशीच वाहतूक शाखेकडून या मद्यपी वाहनचालकांविरोधात मोहीम राबवली जातेे. मात्र, इतर दिवशी त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जाते. विशेष म्हणजे, मद्य प्राशन करून भरधाव वेगने चारचाकी वाहने चालविण्याचे प्रकार कॉलेजराेड, गंगापूररोड, गंगापूर धरण परिसर, आसारामबापू आश्रमरोड परिसरात सातत्याने घडत असल्याने पोलिसांनी एखादी माेठी दुर्घटना घडण्यापूर्वी कठोर कारवाईचे पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरआठवड्याला राबवण्यात येणाऱ्या माेहिमेचा पडला विसर
शहरातीलगुन्हेगारी रोखण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला कोंबिंग ऑपरेशन, चौकाचौकात वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत असतानाही, या मोहिमेचा वाहतूक शाखेला विसर पडलेला दिसून येतो.

पाचमहिन्यांतील कारवाईत केवळ ५२ गुन्ह्यांची नाेंद
जानेवारीते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत पोलिस आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त मोहिमेत ५२ वाहनचालकांविरुद्ध ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चे गुन्हे दाखल केले आहेत. मद्यपी वाहनचालकांची संख्या बघता कारवाई झालेली ही संख्या अत्यंत कमी असल्याचेच या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

थेट प्रश्न
प्रशांतवाघुंडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा
याकडेही लक्ष देण्याची गरज
शहरातूनजाणाऱ्या मुुंबई-आग्रा नाशिक-पुणे या महामार्गांलगत असलेल्या अनेक हॉटेल्स ढाब्यांवर रात्रीदेखील उशिरापर्यंत सर्रास मद्यविक्री चालते. त्यामुळे दूर पल्ल्यासाठी निघालेल्या वाहनचालकांसह शहरातील काही तरुणांचे ग्रुपदेखील अशा ठिकाणी पार्टीसाठी जातात. हे हॉटेल्स ढाबे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने अनेकांच्या पहाटेपर्यंत पार्ट्यांचा धुमाकूळ सुरू असताे. शहरालगत असलेल्या अशा अनेक ठिकाणाहून पार्ट्यांनंतर परतताना वाहनांचे अपघात झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. या ठिकाणांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मद्यपींना अशीही शिक्षा...
कोकणातीलसावंतवाडी परिसरात मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. या कारवाईत सापडलेल्या तळीरामांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून नरेंद्र डोंगराची साफसफाई करून घेतली होती. अशा अनोख्या पद्धतीने या तळिरामांना शिक्षेच्या प्रकाराने चांगलीच अद्दल घडली होती.

वाहतूक शाखेकडे १० ब्रिथ अॅनालायझर
वाहतूकशाखकडे १० ब्रिथ अॅनालायझर यंत्रे असून, त्यांचा वापर वाहनचालकांनी मद्य सेवन केले आहे अथवा नाही, याच्या तपासणीसाठी हाेतो. दुर्दैवाने वर्षातील काही ठराविक दिवसांचा अपवाद वगळता, अन्य दिवशी ही यंत्रे धूळखात पडून असतात. गेल्या काही दिवसांपासून शहरात मद्य पिऊन वाहन सुसाट चालविण्याच्या तक्रारी वाढत असल्याने, त्या भागातही या यंत्रांद्वारे तपासणी मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

कायद्यात अशी अाहे शिक्षेची तरतूद
मद्यप्राशन केलेल्या व्यक्ती किंवा अन्य अंमल असलेल्या व्यक्तीने वाहन चालविल्यास त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८५ प्रमाणे कारवाई हाेेते. जो कोणी दारू पिऊन वाहन चालवत असेल किंवा चालविण्याच्या प्रयत्नात असताना ब्रिथ अॅनालायझर यंत्राद्वारे त्याची श्वास विश्लेषण तपासणी केली जाते. या तपासणीत दोषी आढळल्यास त्याची लगेचच मेडिकल टेस्ट केली जाते. यात प्रत्येक १०० मि.लि. रक्तात ३० मि.ली.पेक्षा अधिक अल्कोहोल आढळून आले किंवा तो औषधीद्रव्याच्या एवढ्या अंमलाखाली असेल की, तो वाहनावर आपला ताबा ठेऊ शकत नसेल तर, अशा परिस्थितीत त्याला पहिल्या अपराधाबद्दल सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दोन हजार रुपयांपर्यंत दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा एकत्रित होऊ शकतात. तसेच, पूर्वी अपराध केल्यापासून तीन वर्षांच्या आत पुन्हा अपराध केल्यास त्या व्यक्तीला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, तीन हजारांपर्यंत दंड अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

चारचाकी वाहनांमध्येच पार्टीचा अड्डा
शहरातआता चारचाकी वाहनांतच मद्य पार्टी करण्याचा एक नवीनच प्रकार बघावयास मिळत आहे. उच्चभ्रू वस्तीत सायंकाळच्या वेळेस रस्त्यावरून मोठ्या आवाजात गाणी लावून सर्रासपणे मद्याचे पेग रिचवले जातात. या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेला खुले आव्हानच दिले जात अाहे. विशेष म्हणजे, या प्रकारात मुलींचाही सहभाग मोठा असल्याचे दिसून आले आहे.
बातम्या आणखी आहेत...