आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drinking Water News In Marathi, Nashik Native People Drinking Mineral Water, Divya Marathi

नाशिककर पितात तीन कोटींचे शुद्ध पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पाणीटंचाईच्या काळातील अशुद्ध पाणी आणि नेहमीच होणारा विस्कळित पाणीपुरवठा यामुळे अनेकजण पॅकबंद पाण्याला पसंती देत आहेत. यातून दिवसाकाठी तब्बल 70 हजार लिटर पाण्याची शहरात विक्री होऊन त्यातून दररोज सुमारे 10 लाख, याप्रमाणे महिन्याला तीन कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.

बाटलीबंद पाणी, पाउच व घरोघरी पाण्याच्या कॅनद्वारे पाण्याचा व्यवसाय तेजीत आहे. या व्यवसायातून रोजगार निर्मितीही मोठय़ा प्रमाणात वाढते आहे. देशात नाशिकमध्ये सात ते आठ ब्रॅँड्सचे बाटलीबंद पाणी मिळते. बाटलीबंद पाण्याचे नाशिकमध्ये चार प्रकल्प आहेत.

खर्च व किंमत : एक लिटरच्या बाटलीची किंमत दोन रुपये, पाण्यावरील प्रक्रियेपोटी 50 पैसे, बांधणीसाठी दीड रुपया व वाहतुकीसाठी 50 पैसे असा साधारणपणे 4.50 रुपये उत्पादनखर्च येतो. 4 ते 5 रुपयांची बाटली 12 ते 15 रुपयांना मिळते.

दिवसाकाठी दीडशे कॅन्सची विक्री
पाण्याच्या दररोज 125 ते 150 कॅन्स, तर 10 ते 15 बाटल्यांचे बॉक्स विकतो. उन्हाळ्यात मागणी जास्त असते. अनेक कंपन्या आहेत. कोणाचा खप जास्त, तर कोणाचा कमी असतो. बबलू परदेशी, राजहंस एजन्सी

बाटलीबंद पाण्याची प्रक्रिया
विविध कंपन्यांच्या पाण्याची किंमत वेगवेगळी आहे. या पाण्याच्या शुद्धिकरणाची प्रक्रिया कशी असावी याची कार्यपद्धतीसुद्धा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने ठरवून दिलेली आहे. त्यात सर्वप्रथम पाणी गाळले जाते. त्यासाठी वाळू व कार्बनच्या गाळण्यांचा वापर होतो. नंतर शुद्धिकरण व निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जाते. तसेच ओझोनेशनची प्रक्रियाही होते.

मोठय़ा कंपन्यांचे रोज 18 हजार लिटर पाणी
बाहेरील ब्रँडचे एका कंपनीचे दररोज 100 ते 150 बॉक्स येतात. एका बॉक्समध्ये 12 बाटल्या असतात. एका बाटलीमध्ये एक लिटर पाणी असते. एकंदरीत 18 हजार लिटर पाणी एक कंपनी विकते. असे सहा ते सात कंपन्यांचे पाणी नाशकात येते. यातून 12 ते साडेबारा हजार लिटर पाणी बाटलीबंद पद्धतीने विकले जाते. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी सुमारे 30 ते 40 टक्क्यांनी वाढलेली आहे. सध्या साडेसतरा ते 18 हजार लिटर पाण्याची विक्री होते आहे.