आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Driver, School Students Held For Ransom, Bus Drivers March

वाहनचालक, शालेय विद्यार्थी धरले वेठीस, बसचालकांचा मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालक तसेच अन्य प्रवासी वाहतूकदारांवर पोलिसांकडून नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या एकतर्फी कारवाईचा निषेध करण्यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी (दि. १७) श्रमिक सेनेच्या वतीने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या मिनी स्कूल बसचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
मोर्चात सहभागी या वाहनधारकांमुळे मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते वाहतूक कोंडीत सापडले होते. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना याचा मनस्ताप सहन करावा लागलाच, शिवाय या बंदमुळे विद्यार्थी-पालकांचीही धावपळ झाली.
श्रमिक रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रकचालक-मालक संघटनेने सर्व शालेय मिनी स्कूल बस विद्यार्थी वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चा सकाळी ११ वाजता सुरू झाला. गोल्फ क्लब, शालिमार, एमजीरोड, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. प्रत्येक शाळेजवळ विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अधिकृत थांबा द्यावा, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर खोट्या केसेस दाखल करू नये, वाढणाऱ्या गुन्हेगारीवर अंकुश लावावा, पाेलिसांकडून हॉकर्सवर वारंवार कारवाई करू होऊ नये आदी मागण्यांसाठी श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल यांच्या नेतृत्वाखाली माेर्चा निघाला.

यामध्ये विद्यार्थी वाहतूक विभागाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाथरे, श्रमिक सेनेचे महानगरप्रमपख मामा राजवाडे, उपजिल्हा संघटक सईद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष जहीर शेख, नाशिक जिल्हा संघटक अजय बागुल, कार्याध्यक्ष भगवंत पाठक यांच्यासह हॉकर्स संघटना, कामगार सेना आदींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात मिनी स्कूल बस, मारुती व्हॅन वाहनधारकांनी सहभाग घेतल्याने एम.जी. रोड, सीबीएस भागात वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

विद्यार्थी,पालकांचे प्रचंड हाल
शालेयवाहतूक करणाऱ्यांनीही बंद पुकारल्याने शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे हाल झाले. सध्या परीक्षेचा कालावधी असल्याने मुलांना शाळेत पाेहाेचविण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागली. या मोर्चामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागली.

शैक्षणिक नुकसान
^सध्याशालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत. मात्र, वाहतूकदारांच्या संपामुळे अाम्हाला आमच्या मुलांना शाळेत पाठवता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आज मोठे शैक्षणिक नुकसान झाले. -सचिन कर्डिले, पालक

निषेधासाठी मोर्चा
^शालेयविद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवर पोलिसांकडून एकतर्फी कारवाई केली जाते. एकीकडे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे, याकडेही पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. पोलिसांच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. -सुनील बागुल, संस्थापकअध्यक्ष, श्रमिक सेना

वाहनधारक, कामगारवर्ग अडकले कोंडीत
शहराच्यामध्यवर्ती भागातून काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीत अनेक वाहनधारक, कामगारवर्ग, विद्यार्थी अडकले होते. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
श्रमिक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली, पालक विद्यार्थ्यांचेही हाल झाले.