आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळाचा विद्यार्थ्यांना बसताेय शैक्षणिक फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरवासीयांना दुष्काळाचा सामना करावा लागत असला, तरी त्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या दुष्काळामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याने नागरिकांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेष फेब्रुवारी महिन्यापासून दहावी, बारावी यासह प्राथमिक शाळांच्या परीक्षा सुरू होतात. मात्र, यंदा ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अभ्यासासह घराच्यांना मदत म्हणून पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने त्याचा अप्रत्यक्ष शिक्षणावर परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. परंतु, पाणी महत्त्वाचे असल्याने नाइलाजाने जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असतात. यंदा याच दरम्यान ग्रामीण भागात पाण्याची पातळी घटत असल्याने दुष्काळाचे स्वरूप निर्माण होते. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळाच्या झळा अधिकच जाणवू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यावर अभ्यासाऐवजी कोवळ्या डोक्यावर पाण्याचा भरलेला हंडा वाहण्याची नामुष्की येत आहे.

गावकऱ्यांचे राजकारण
दुष्काळहा नैसर्गिक असून त्यामध्ये काही गावामध्ये स्थानिक पातळीवर राजकारण सुरू झाले आहे. दुष्काळासाठी सरपंच जबाबदार नसला तरी गावातील प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत सुविधा देणे ही त्याची नैतिक जबाबदारी असते. मात्र, दुष्काळी परिस्थितीचाही गावातील सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.
बातम्या आणखी आहेत...