आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येवला दुष्काळी जाहीर करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला- तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आजपावेतो केवळ 37 टक्केच पाऊस तालुक्यात झालेला असल्याने शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
दुबार पेरणीची पिकेही पावसाअभावी वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तालुका दुष्काळी जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने 23 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. ऑगस्ट महिना उलटूनही भीषण परिस्थिती आहे. जानेवारी 2012 पासून तालुक्यात टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शहरातील नागरिकांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जिल्हाधिकारी विलास पाटील व पालखेडचे कार्यकारी अभियंता अंकुश देसाई यांनी येवला नगरपालिका शिष्टमंडळास पाणी आवर्तन न देता परतावून लावल्याने पाणीटंचाई आणखी गंभीर झाली आहे. तालुक्यातील 38 गाव पाणी योजनाही संकटात आहे. या योजनेला पाणीपुरवठा करणार्‍या तलावात आठ दिवसांचा साठा आहे.
या आहेत मागण्या - महावितरणने वीजबिलांची आकारणी करू नये, खरीप पीक कर्ज 100 टक्के माफ करावे, नवीन शेतकर्‍यांना कर्ज देऊ नये, रोजगार हमीची कामे सुरू करून मजुरांना मजुरीचे पैसे मिळावे, दुष्काळसदृश स्थितीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफ करावी, जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, येसगाव तलावातून नव्याने पाइपलाइन टाकून शहरासह 38 गावांचा पाणीप्रश्न सोडवावा.