आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकेनसाठी रस्त्यावर भीक मागितली, लोकांना फसवलं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लंडनस्थित गुजराथी कुटुंबातील राजीव पटेल हा शाळेत जात असताना वयाच्या अकराव्या वर्षीच विविध व्यसनांच्या चक्रात अडकला. हा चक्रव्यूह त्याने वयाच्या 26व्या वर्षी भेदला. आता तो व्यसनाधीन तरुणांना समुदेशन करतो. त्याच्या व्यसनमुक्तीच्या या संघर्षाची कहाणी त्याच्याच शब्दात..

मूळचे गुजराथी; पण लंडनस्थित माझं कुटुंब. डॅड मल्टिनॅशनल कंपनीत अकाउंटंटचा जॉब करतात, तर आई ऑप्टिशियन आहे. लंडनमध्ये शिकत असताना वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी बिअरचा घोट घेतला. फारसे समजत नसल्याने मित्र सांगतील तसं मी करायचो. काही दिवसांत कॅनाबीस (गांजाचा प्रकार) ओढायला लागलो. हळूहळू गांजाचे मॅरोवाना आणि हॅश हे प्रकारही टेस्ट केले. वर्गातील मोठी मुले गांजा आणून देत. काही काळानंतर हा पदार्थ आवडायला लागला. त्यानंतर मला खासगी शाळेत टाकले. तेथे शाळेतून मी बोर्डिंगमध्ये जायचो. तेथे मोकळीक मिळाल्याने ड्रगच्या पूर्णत: आहारी गेलो.

बारावीत शिक्षणातील रस कमी झाला आणि व्यसनांची गोडी वाढली. यानंतर ओळख झाली ती स्पीड व एक्सटसीची. हे महाभयंकर ड्रग मानलं जात. यातून एनर्जी वाढते असा समज असल्याने ते घेऊन मी पबमध्ये रात्र-रात्र डान्स करायचो. आई-बाबांना हे ठाऊक नव्हतं. मुलगा वयात आलाय, इथल्या कल्चरप्रमाणे थोडीफार मजा करीत असेल असा त्यांचा समज. पण, त्याचाच फायदा उचलत मी व्यसनांच्या आहारी गेलो. काही कालावधीनंतर मी सुपर अँग्रिसिव्ह झालो. काहींवर हात उचलला. त्यामुळे घरापर्यंत पोलिस आणि डॉक्टर्स आले. त्यांनी मेंटल हेल्थ क्लिनिकमध्ये दाखल केलं. सहा महिने तेथे राहिल्यावर बाहेर आलो आणि विमा कंपनीत कामाला लागलो. पण, तेथेही कोकेनने पिछा सोडला नाही. तेथून मला मुंबईला उपचारासाठी पाठविले; परंतु तेथेही सुधारणा झाली नाही. पुन्हा लंडनमध्ये गेलो. पैसे मिळविण्यासाठी भीक मागायला लागलो. लोकांना फसवलं. वेळप्रसंगी चोर्‍याही करायचो. त्यामुळे मला कोर्टात उभं करण्यात आलं. तेथे मी एकच मागणी केली ‘आय वॉण्ट टू चेंज’ त्यानंतर मला मुंबईत पुन्हा दाखल करण्यात आलं. तेथून मला नाशिकमध्ये आणण्यात आलं. येथे हिंदुस्थाननगरला लाइफ रिहॅबीलेशन सेंटरमध्ये मी मानसिक उपचार घेतोय. आता मी पूर्णत: बरा आहे.