आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यपान करून गैरवर्तन केल्याने मुख्याध्यापक निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका शाळेतील शिष्यवृत्तीत मोठा अपहार केल्याने शाळेत मद्यपान करून गैरवर्तन केल्याने महापालिका शिक्षण मंडळाने बुधवारी मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली. सातपूरच्या शिवाजीनगर परिसरातील पालिका शाळा क्रमांक ९९ मधील मुख्याध्यापक विजय मोहन भोसले यांनी मद्य प्राशन करून शाळेत गैरवर्तन केल्याचे आढळून आले. तसेच, काही दिवसांपासून त्यांनी शिष्यवृत्तीच्या रकमेत माेठा अपहार केल्याचेही अाढळल्याने शिक्षण मंडळ सभापतींच्या आदेशाने मुख्याध्यापक भोसले यांना निलंबित करण्यात आले. पालिका शिक्षण मंडळातर्फे शाळा तपासणी माेहीम सुरू असून, त्यात ही कारवाई करण्यात अाल्याची चर्चा अाहे.
बातम्या आणखी आहेत...