आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगारांचीच अाता भीती वाटायला लागली, डाॅ. विजया राजाध्यक्ष यांची भावना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘पुतळे’ कवितेत कुसुमाग्रजांनी व्यवस्थेवर टाेकदार शब्द लिहिले. यामुळेच ‘ते हाेते जिवंत अन हा जीवन भास’ या अाेळी अाठवतात. अनेक श्रेष्ठ लाेकांचे जीवन हे जिवंत हाेते, अापण मात्र भासात जागताे अाहाेत. साकल्याचा प्रदेश नाहीसा झाला अाहे, अाता सगळीकडे सरहद्दी स्पष्ट झाल्या अाहेत.
 
‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर कुठे अाहेत, तुकाराम कुठे अाहेत, असा प्रश्न अाता निर्माण हाेताे. विचार शक्तीच मारणारं हे जीवन अाहे. त्या काळी युद्धं नकाे हाेती, अाता युद्धंच हवी अाहेत. सगळं जगच तुरुंग झालंय की काय, असं सामाजिक वास्तव हाेतं अाहे. त्यामुळे अाता या अंगारांचीच भीती वाटायला लागली अाहे....’ अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. विजया राजाध्यक्ष यांनी व्यक्त केली. 

 कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे साेमवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त डाॅ. राजाध्यक्ष यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधु  मंगेश कर्णिक यांच्या हस्ते जनस्थान पुरस्कार प्रदान करण्यात अाला. या वेळी सत्काराला उत्तर देताना बाेलत हाेत्या. एक लाख रुपये, मानपत्र अाणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे.
 
डाॅ. राजाध्यक्ष म्हणाल्या, ‘कधी-कधी सामाजिक अंगारांचे चटके कसे असतात तेही जाणवले पाहिजे. कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांमधून ते जाणवते. कुसुमाग्रजांच्या अागगाडी अाणि जमीन तसेच अहिनकुल या कवितांचा अाधार घेत त्या म्हणाल्या की, तात्यांच्या अनेक कवितांमध्ये साम्यवादी विचार दिसताे. ते काेणत्याही पक्षाचे नव्हते. त्यांची कवितेशी वेगळीच निष्ठा हाेती. अाता तसे लाेक उरले नाहीत. बळवंताला बळी देणारेच उरले नाहीत. सगळीकडे फक्त खच्चीकरण झालं अाहे. विघटनाचं भीषण स्वरूप सामाेर येतं अाहे. भाेवतीचे कीटक त्यांना गिळायलाच बसले अाहेत. कुसुमाग्रज अाजही असते तरी त्यांनाही हाच प्रश्न पडला असता.’   
 
भाषेबद्दल दु:खी हाेण्याचं कारण नाही: अाज भाषा सरमिसळ हाेते अाहे. याबद्दल दु:खी हाेण्याचं अजिबातच कारण नाही. काेणतीच भाषा दुसऱ्या भाषेला खुला प्रवेश देत नाही; पण नाकारतही नाही.  ज्ञानाच्या खिडक्या उघडल्या पाहिजेत, तरच भाषेचे विश्वरूप दर्शन घेता येईल. नातं दृढ करणारी मराठी भाषाच अाहे. तिचा टिळा लावला तर अापल्याला काहीच अशक्य नाही. अादानप्रदान नक्कीच व्हावे; पण त्यात उदारपणा असावा. इंग्रजीचा तिटकारा नकाे; पण वरचढपणाही नकाेच. भाषा ही अात्मखूण असते, अस्तित्व देते, संस्कृती देते. भाषेला विषबाधा हाेऊ न देणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच अाहे.
 
अापण काेणत्याही भाषेचे गुलाम हाेता कामा नये. सम्राटासारखं तिला सामावून घेतलं पाहिजे. दांभिक व्हायला नकाे. प्रत्येकाला मराठी चांगलं अालं तर प्रश्नच मिटतील. मराठी माध्यमाच्या शाळा असल्या पाहिजेत, यासंदर्भातील शासन निर्णय घातक अाहेत. ते निर्णय शैक्षणिक नाही, सांस्कृतिक अाहेत. पाठ्यपुस्तकांमधून अाजची प्रस्तुती अाली तरच भाषेवर प्रेम जडेल, शाळा हा त्याचा पाया अाहे. भाषेचे कुठेही गाैरवीकरण नकाे; पण अवहेलनाही हाेता कामा नये,’ असे डाॅ. राजाध्यक्ष म्हणाल्या.  

बटाटेवड्यांच्या पैशांतून ‘विशाखा’   
मला अाजही अाठवतं की, मी माझ्या पैशांतून घेतलेलं पहिलं पुस्तक ‘विशाखा’ हाेतं. घरातील वडिलधाऱ्या माणसांनी बटाटेवडे खाण्यासाठी दिलेल्या पैशांतून मी विशाखा विकत घेतलं हाेतं. ते बी माझ्यात रुजलं हाेतं. ते अंकुरलं त्याला शाखा, प्रशाखा निर्माण झाल्या. हा महावृक्ष बहरलेलाच अाहे. त्याचे गारूड अाजही कमी झालेलं नाही. भाषा-संस्कृतीवर एकाद्या अनिभिषिक्त सम्राटासारखे ते गारूड अाहे, असे विजयाताईंनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...