आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रॉनिक तिकीटामुळे एसटीचे वर्षाला वाचतात 25 लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नेहमीच तोट्यात राहणार्‍या राज्य परिवहन महामंडळाने (एसटीने) आता इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्युईंग मशिनच्या माध्यमातून (इटीआयएम) तिकीट उपलब्ध करुन देत दर वर्षाला कागदांच्या तिकिटांच्या यंत्रणेवर होणारा सुमारे 25 लाखांचा खर्च कमी करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यभरात वाहकांना तिकीट देण्यासाठी करावी लागणारी कसरत बंद झाली असून, कामकाजाला गती प्राप्त होत पर्यावरणाचेदेखील संवर्धन होण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात 1 नोव्हेंबर 2009 पासून इटीआयएम यंत्राचा टप्याटप्याने प्रारंभ करण्यात आला. जानेवारी 2010 पासून संपुर्ण शहर व जिल्ह्यातील बससेवेस त्याची अंमलबजावणी झाली आहे. शहर बससेवेसाठी 350 व ग्रामीण आगारात 1430 वाहकांना यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. वाहकांना होणारा त्रास, फुकट प्रवाशांची कटकट आणि काही जणांकडून करण्यात येणारा भ्रष्टाचार या सार्‍यांना मशिनच्या वापराने आळा बसला आहे.


असा होतो तिकिटांचा प्रवास
0 महिन्याकाठी 13 आगारांना लागत होती 119 ब्लॉक तिकिटे
0 एका ब्लॉकमध्ये 1 लाख ते 1 लाख 15 हजार असे सुमारे 1 कोटींपर्यतचे तिकीटे एसटीला खरेदी करावी लागत.
0 यासाठी विभागीय कार्यालयाला यायचा 4 लाख 60 हजारांचा खर्च
0 तिकिटांचा हिशेब सांभाळण्यासाठी प्रत्येक आगारात तीन ते चार लिपिक, तिकीट ठेवण्यासाठीच्या खोलीला सुरक्षारक्षक असे किमान 45 ते 50 अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावे लागले होते. या कर्मचार्‍यांवर सुमारे 8 ते 10 लाखांचा वेतनापोटी खर्च करावा लागत होता.


इलेक्ट्रॉनिक यंत्रामुळे हा खर्च वाचून प्रत्यक्ष:त संपुर्ण यंत्रणा राबविण्यासाठी 12 लाख 50 हजाराचा खर्च येत आहे. यामध्ये ज्या ट्राईमॅक्स कंपनीकडून महामंडळाने यंत्र खरेदी केले आहेत, त्यांच्याकडून सेवा देण्यासाठी स्वतंत्र इंजिनीअर व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावरून महामंडळाला दरमहा दीड ते दोन लाख याप्रमाणे वर्षाकाठी 24 ते 25 लाखांची बचत होत आहे.


मनुष्यबळासोबत पर्यावरण संवर्धनात यश

4इलेक्ट्रॉनिक्स यंत्रामुळे सुरूवातीला काही अडचणी आल्या. मात्र, आता वाहकाच्या कामात गती आली असून महामंडळाच्या अतिरीक्त कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ वाचले असून त्यांच्या वेतनावर होणार्‍या खर्चाची बचत होणार आहे. तिकीटांसाठी मोठय़ा प्रमाणात कागद लागत असल्याने तो कमी झाल्याने पर्यावरण संवर्धनाचे काम झाले आहे. कैलास देशमुख, विभागीय नियंत्रक


यंत्रातील तांत्रिक दोष अडचणीचे
इलेक्ट्रॉनिक्स यंत्र बेस्टने नाकारले असताना महामंडळाने ते स्वीकारले. ट्रायमॅक्सच्या यंत्राच्या बॅटर्‍या काही दिवसातच उतरून जातात. वारंवार चार्जींग करावे लागत असून संबंधित कंपनीने वर्ष-दीड वर्षात बॅटरी बदलाव्यात. त्यात शहरात सीटीबसेस मध्ये या यंत्रातून तिकीट येण्यास विलंब होत असल्याने काही प्रवासी विनातिकीटच उतरून जातात. यासाठी दर्जेदार आणि मुंबई, पुण्यासारख्या यंत्राच्या धर्तीवर यंत्र उपलब्ध करून द्यावेत. विजय पवार- प्रादेशिक सचिव, मान्यताप्राप्त संघटना