आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरांतोनंतर पाणी ठरतेय नाशिककरांना अडचणीचे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - मनमाड,लासलगाव, निफाड आणि नाशिकच्या चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी पंचवटी ही सर्वात महत्त्वाची प्रवासी गाडी आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या दुजाभावामुळे पंचवटीऐवजी दुरांतोला दिली जाणारी पसंती ही नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांवर अन्यायकारक ठरत आहे. महिनाभरापासून पंचवटीमध्ये नाशिकराेड स्थानकावर पाणी भरण्यात येत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहाेचण्यासाठी उशीर होत अाहे. बुधवारी (१३ जानेवारी) पुन्हा पंचवटी ही ४० मिनिटे उशीर झाल्याने प्रवाशांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी सहायक पाेलिस उपनिरीक्षक महेश महाले सहकाऱ्यांनी प्रवाशांना शांत करीत परिस्थिती हाताळली.

नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना मंुबईला जाण्यासाठी मनमाड येथून पंचवटी, गोदावरी या रेल्वे सुरू करण्यात आल्या आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाचा पूर्वीपासूनच जवळच्या पल्ल्याच्या गाड्यावर अन्याय केला जात आहे. जिल्ह्यातून पंचवटीने प्रवास करणारे शेकडो प्रवासी आहेत. सुपरफास्ट गाडीचे पैसे मोजूनही वेळेवर पोहाेचता येत नसल्याने अनेक व्यक्ती रस्त्याने प्रवास करण्याला पसंती देत आहे. त्यामुळे रेल्वेच्या महसुलावरही परिणाम होत आहे. स्थानिक रेल्वेच्या अधिकाऱ्यांना अजूनही त्याचे गांभीर्य नसल्याचे पुढे येत आहे. पंचवटीऐवजी दुरांतो एक्स्प्रेस पुढे पाठविली जात असल्याने रोज अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. त्याचप्रमाणे आता मनमाड येथे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची गैरसोय होत असल्याने नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पाणी भरण्यात येते. परंतु, २१ बोगींची असलेल्या पंचवटीमध्ये पाणी भरण्यासाठी कर्मचारी संख्या अपुरी असल्याने तेथेही वेळेचा अपव्यय होत आहे. बुधवारी प्रवाशांचा संताप अनावर झाल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

अन्यथा तीव्र अांदाेलन
गाडीतपाणी भरणे हे ठीक आहे परंतु, दुरांतोसारखी गाडी पुढे काढणे हे चुकीचेच आहे. पाणी भरण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी आणि गाडीच्या धावण्याचा वेग वाढवून प्रवाशांना वेळेवर मुंबईत पोहाेचवावे, अन्यथा आता प्रवासी संघटना तीव्र आंदोलन करणार आहे. राजेश फोकणे, प्रवासी