आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस फंडामुळे नाशिकमध्ये सायकल क्रेझ जाेरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक सायकलीस्टसह विविध स्तरावरून चालविल्या जात असलेल्या सायकल चालवण्याच्या माेहिमेला खूप चांगला प्रतिसाद लाभत असून, दरवर्षी सु्ट्यांच्या दाेन महिन्यांच्या काळात हाेणाऱ्या सायकलविक्रीच्या प्रमाणातही यंदा अवघ्या १५ दिवसात १५ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून अाली अाहे. पूर्वी केवळ गरज म्हणून हाेणाऱ्या सायकलखरेदीला अाता ‘फिटनेस फंडा’ म्हणून बघितले जाऊ लागल्यानेदेखील सायकल विक्रीचे चक्र जाेरात फिरु लागले असल्याचे मत सायकलविक्रेत्यांनी व्यक्त केले.
शहरात एकेकाळी गरज म्हणून सायकल वापरण्याचे दिवस इतिहासजमा झाल्यानंतर सायकली वापरण्याचा कल बहुतांशरित्या कमी झाल्याचे जाणवू लागले हाेते. मात्र, गत दाेन-तीन वर्षांपासून नाशिकमध्ये सायकलला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी दिला जात असलेला भर अाणि सातत्यपूर्ण उपक्रमांमुळे एकूणातच सायकल चालवण्याकडे लाेक पुन्हा एकदा वळू लागले अाहे.

तब्बल१५ टक्क्यांहून अधिक वाढ : दरवर्षीच्या उन्हाळ्याच्या सुटीत नाशिकमधील प्रमुख ते विक्रेते अाणि अन्य सुमारे २० सायकल विक्रेत्यांच्या माध्यमातून साडेचार ते पाच हजार सायकल्सची विक्री केली जाते. त्यात एप्रिलच्या प्रारंभापासूनच सुमारे १५ ते २० टक्के वाढ हाेत असल्याचे जाणवू लागले अाहे. त्यामुळे नाशकात सायकलींचे प्रमाण वाढण्यासह एकूणातच नागरिकांच्या मानसिकतेत सायकलबाबत सकारात्मक बदल दिसू लागला असल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.

स्विमिंगटँक बंदचाही परिणाम : बहुतांश पालक सुट्ट्यांमध्ये मुलांना स्विमिंग टँकवर त्यांना पाेहण्यास पाठवतात. मात्र, यंदा जलतरण तलाव पूर्ण बंद असल्याने मुलांच्या सुट्ट्यांमध्ये त्यांना अन्य काेणत्या तरी खेळाला टाकण्याकडे पालकांचा कल दिसून येत अाहे. त्यामुळेदेखील पालकांचा अाणि बालकांचा सायकलींगकडे अाेढा असल्याचे चित्र दिसून येत अाहे.

सायकलीस्टच्या प्रतिष्ठेत वाढ
नाशिकसायकलीस्टसारख्या संघटना जे उपक्रम राबवत अाहे, त्यानिमित्ताने नाशिकमध्ये सायकलींगचे वातावरण तयार हाेऊ लागले अाहे. तसेच अाता अगदी उच्च स्तरातील मान्यवरही सायकलींग करताना दिसू लागल्याने त्याचा सामान्यांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम हाेत असल्याचे दिसून येत अाहे. त्याशिवाय नाशिकच्या डाॅ. महाजन बंधुंनी पटकावलेले रॅम ’चे विजेतेपद यामुळेही सायकलींगमडे कल वाढत अाहे.

अाधुनिक सायकल खरेदीकडे कल
सगळीकडेच पूर्वीपासून सायकलकडे गरज म्हणूनच बघितले जात हाेते. त्यामुळे कमीत कमी किंमतीच्या सायकली घेण्याकडे नागरिकांचा कल हाेता. मात्र, त्याउलट अाता सायकलींग हा गरजेपेक्षाही ‘ फिटनेस फंडा’ चा भाग म्हणून बघितला जाऊ लागला अाहे. त्यामुळे अाधुनिक, गिअर सायकल्स खरेदी करण्याकडेही सामान्य नागरिकांचा अाेढा वाढला असून विक्रीत १० ते १५ टक्के वाढ अाहे. - किशाेर काळे , विक्रेता,सायकल फर्म