आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Inter Caste Marriage Caste Panchayat Bycotte On Family

नाशकात आंतरजातीय विवाह केल्याने जात पंचायतीचा कुटुंबावर बहिष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने समाजाची बदनामी झाल्याचा दावा करत जात पंचायतीने एका कुटुंबावरच बहिष्कार टाकला. पीडित कुटुंबाने केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पंचायतीच्या सदस्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली. बहिष्कारानंतर या कुटुंबाने पोलिस आयुक्तांकडे दाद मागितली होती. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पंचवटी ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


अण्णा नवसा हिंगमिरे (गंगापूर रोड) यांच्या दुस-या मुलीने प्रशांत छाजेड या मुलाशी विवाह केला होता. या विवाहास हिंगमिरे कुटुंबाचीही मान्यता होती. मात्र, जातीच्या लोकांनी विरोध केला व समाजाच्या पंचायतीने कुटुंबावरच बहिष्कार टाकला होता. बहिष्कार टाकून 5 हजार पाचशे रुपये दंड आकारत कुटुंबाला जातीबाहेर केले होते.


गेल्या आठवड्यात जात पंचायतीच्या बहिष्कारामुळे एक खून झाला होता. प्रभारी पोलिस आयुक्त साहेबराव पाटील यांनी गंभीर दखल घेत दोन्ही पक्षांचे म्हणने एकून घेतले. यातून तेढ वाढण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी पंचयतीच्या अध्यक्ष भास्कर रखमाजी शिंदे, पंच रावजी कुंभारकर, लक्ष्मण शिलू शिंदे, रघुनाथ बापू धुमाळ, भिमा गंगाधर धुमाळ, मधुकर भावराव कुंभारकर यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात खंडणी, जिवे मारण्याची धमकी अशा कलमांखाली गुन्हे दाखल केले व त्यांना अटक करण्यात आली.